शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

लोहारी येथे पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:07 IST

लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून एकूण एक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

ठळक मुद्देदोन ठिकाणी झाली घरफोडीएक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरीसबंद घरातून चोरटे चोरी करण्यात यशस्वी, मात्र दुसऱ्या ठिकाणी झाली निराशा

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून एकूण एक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. जळगाव येथून श्वानपथक बोलविण्यात आले होते. हॅप्पी नामक श्वानाने वरखेडी-पाचोरा रस्त्यापर्यंत माग दाखविला व येथपर्यंतच हॅप्पी घुटमळला. हे.काँ. साहेबराव चौधरी यांनी हाताच्या बोटांचे ठशाचे नमुने घेतले.या घटनेत डॉ.भूषण मन्साराम महाजन यांच्या बंद घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून कपाटातून चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने लांबविले. यात २० ग्रॅमची मंगलपोत, पाच ग्रॅमच्या गळ्यातील दोन चेन, एक ग्रॅमच्या चार अंगठ्या, नऊ ग्रॅमचे कर्णफुल तसेच चार ग्रॅमचे ओम पान, सटी इ.सह ९२ हजारांचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये रक्कम लंपास केली. डॉ.भूषण महाजन हे अधूनमधून पाचोरा येथे आपल्या वडिलांकडे जातात. गुरुवारी रात्रीदेखील ते पाचोरा येथे आपल्या वडिलांकडे मुक्कामी होते.शुक्रवारी सकाळी डॉ.महाजन यांचा कंपाऊंडर मुलगा दूध घेऊन आला असता त्याने दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला पाहिला. तेव्हा घरमालक गजानन पाटील यांना फोनवरून माहिती दिली, तर एका घराच्या आड असलेल्या वसंत देवचंद नाथ यांच्या घरीदेखील चोरट्यांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. परंतु नाथ परिवाराने आपल्या घरातील रक्कम व दागिने कपाटात न ठेवता सुरक्षितपणे एका डब्यात ठेवल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. वसंत नाथ यांची पत्नी २७ पासून आजारी असल्याने पाचोरा येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने पती-पत्नी दोघेही या रुग्णालयामध्येच होते.पिंपळगाव (हरेश्वर)पोलीस स्टेशनचे स.पो.नि.रवींद्र बागुल यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी श्वानपथक व असे तज्ज्ञांचे पथक याठिकाणी बोलवून पंचनामा केला.पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली.पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी सात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.डॉ.महाजन यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, हे.कॉ.हरी पवार, सचिन वाघ, विजय माळी, राजेंद्र पाटील करीत आहेत.दोनच दिवसांपूर्वी ‘लोकमत’मधून या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त म्हणजे वास्तव परिस्थिती दर्शविणारे होते. हे या घटनेवरून लक्षात येते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPachoraपाचोरा