शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चित्र, वक्तृत्वातून अवयवदानाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:03 IST

रोटरीतर्फे जनजागृती अभियान : कर्करोग, अवयवदान, रक्तदानावर स्पर्धा

जळगाव : रोटरी क्लब बॉम्बे नॉर्थ, रोटरी क्लब पाचोरा- भडगाव व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जळगावात कर्करोग, अवयदान, रक्तदान यावर जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले़ यात सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. व नव्या कल्पना व उत्कृष्ट चित्र साकारून तसेच वक्तृत्वाच्या माध्यमातून कर्करोगाची कारणे, अवयवदान व रक्तदान यांचे महत्त्व विषद करणारा संदेश दिला़ उत्कृष्ट चित्रांना पारितोषिके देण्यात आली.शनिवारी पाचोरा येथे ही स्पर्धा झाल्यानंतर रविवारी जळगाव शहरातील गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली़ मुंबई येथील डॉ़ अंजली पाटील, डॉ़ गिरीश वालावरकर यांनी मार्गदर्शन केले़ रूक्साना खान यांनी स्वच्छतेचे आवाहन केले़रोटरी क्लब बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष हेमेंद्र शहा व जळगावचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यात अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करणे व कर्करोगावर मार्गदर्शन हे या उपक्रमाच्या आयोजनामागचे उद्देश असल्याचे ते म्हणाले़ यावेळी सचिव शिरीष तारे, धरम पोपट, सचिव संदीप शर्मा, सहप्रांतपाल अनिल अग्रवाल, डॉ़ शशिकांत गाजरे, डॉ़ जयंत जहागीरदार, डॉ. मंगला जंगले, डॉ़ तुषार फिरके, राजीव आडवाणी, डॉ़ काजल फिरके, प्रा़ शुभदा कुलकर्णी, सी़ डी़ पाटील, प्रभाकर जंगले, योगेश गांधी, जितेंद्र ढाके, स्वाती ढाके आदींची उपस्थिती होती़ कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी परीक्षण केले.चित्रकला स्पर्धेतील विजेतेअ गट : प्रथम- जय मनोज ठाकरे, द्वितीय- तनिष्का अनिल सुरवाडे, तृतीय - भरत संजय सोनार, उत्तेजनार्थ - खुशी पवनकुमार हरवानी.ब गट : प्रथम -समय चौधरी, द्वितीय - तनुश्री प्रकाश भारूडे, तृतीय- चहक मोहन गेही, उत्तेजनार्थ रोशनी प्रभारक बोर्डे.क गट : प्रथम- सेजल गोपाल वनरा, द्वितीय-कोमल दिलीप निकम, तृतीय-विद्या हेमराज सपकाळे़वक्तृत्व स्पर्धेतील विजेतेअ गट : प्रथम- योगिता पाटील (५ वी, जिजामाता माध्यमिक विद्यालय), द्वितीय- आर्यन मोरे (७ वी, जिजामाता माध्यमिक विद्यालय), तृतीय -दिव्या गोसावी (६ वी, य़ दे़ पाटील माध्यमिक विद्यालय), उत्तेजनार्थ- यश खैरनार (७ वी, बालनिकेतन विद्यामंदिर), ब गट : प्रथम- धनश्री सन्नांसे (जिजामाता माध्यमिक विद्यालय), द्वितीय - अंकिता गोपाळ माळी, (जिजामाता माध्यमिक विद्यालय), तृतीय हर्षा मानिक दहिभाते (जयदुर्गा माध्यमिक विद्यालय) उत्तेजनार्थ- आदित्य रवींद्र माळी (नवीन माध्यमिक विद्यालय) क गट : प्रथम- अंजली अहिरे (एसएनडीटी महाविद्यालय), द्वितीय- शीतल बाविस्कर (एसएनडीटी महाविद्यालय), तृतीय -चेतना सोनगिरे (एसएनडीटी महाविद्यालय)

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव