शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबाई महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:21 IST

स्थानिक कलावंतांसोबतच महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांनी जळगाव येथे झालेल्या बहिणाबाई महोत्सवाला हजेरी लावली. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारुडकार निरंजन भाकरे, युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडविले.अमेरिकेपर्यंत महाराष्ट्राची लोकपरंपरा पोहचवणारे जागतिक कीर्तीचे भारुडकार, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामानंद उगले यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ ...

स्थानिक कलावंतांसोबतच महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांनी जळगाव येथे झालेल्या बहिणाबाई महोत्सवाला हजेरी लावली. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारुडकार निरंजन भाकरे, युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडविले.अमेरिकेपर्यंत महाराष्ट्राची लोकपरंपरा पोहचवणारे जागतिक कीर्तीचे भारुडकार, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामानंद उगले यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. उत्कृष्ट व रंगतदार विडंबनात्मक शैलीतील सादरीकरणाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू खेळवले. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील वासुदेव, महाराष्ट्राचा गौरव वर्णन करणारा पोवाडा, गण, बतावणी सादर झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूकच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेलेल्या युवा पिढीवर भाष्य करणाºया विडंबनात्मक भारुडाने प्रेक्षकांची दाद मिळविली.राज्यात कोठेही गेल्यास ‘बुरगुंडा होईल बया गं’ या भारुडामुळे प्रसिद्ध असलेले निरंजन भाकरे यांनी बहिणाबाई महोत्सवामध्ये भारुड या लोककलेचे सादरीकरण केले. भारुडातून जनप्रबोधन करण्यासोबतच सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाकरे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. सोंगी भारुड व एकनाथी भारुडाची परंपरा पुढे चालविणाºया मोजक्या कलावंतांपैकी निरंजन भाकरे हे एक कलावंत आहेत. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुड्या जोशी, भविष्यकार या सोंगी भारुडाला तर प्रख्यात एकनाथी भारुडाला प्रेक्षकांनी दाद दिली. एकंदरीत, खान्देशी मातीचा अभिमान सांगणारा, संस्कृतीचे गोडवे गाणारा आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणारा हा लोकोत्सव पाच दिवस रंगला होता.संस्कृतीचा महोत्सवनृत्य, नाट्य, संगीत यासोबतच चित्रकला, पोस्टर्स या कलांनाही प्रोत्साहन मिळावे याकरिता बहिणाबाई महोत्सवात पोस्टर्स स्पर्धाही रंगली. विविध वयोगटातील चित्रकारांच्या कुंचल्यातून उमटलेले रंगाचे आविष्कार खान्देशी संस्कृतीचे इंद्रधनुष्य उमटविणारेच ठरले.- विनोद ढगे

टॅग्स :Jalgaonजळगाव