शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'लोकप्रतिनिधी' शासन आणि जनतेमधील दुवा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:25 IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण

ठळक मुद्देचाळीसगाव येथे शासकीय योजनांच्या जत्रेत लाभार्थींना विविध वस्तू, दाखले, प्रमाणपत्रांचे वितरणचाळीसावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदेश लवकरचमराठा आक्षणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.९ : लोकप्रतिनिधी जागृक असेल तर तो शासनाच्या योजना आपल्या मतदार संघातील जनतेपर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतो. आमदार उन्मेष पाटील यांनी कृषि महोत्सवासह शासकीय योजनांची जत्रा भरविल्याने शासन जनतेपर्यंत पोहचले आहे. चाळीसगावचा हा उपक्रम आणि आमदार पाटील हे शासन व जनतेमधील ठळक दुवा ठरले आहेत, असे प्रतिपादन महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. राज्यातील विद्यमान सरकार हे जनतेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. यासाठी आम्ही बांधील आहोत. असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले.सोमवारी त्यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता शासकीय योजनांच्या जत्रेत लाभार्थींना विविध वस्तू, दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी स्व. उत्तमराव पाटील विचार मंचावर खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.च्या सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील, के.बी.साळुंखे, प्रांत अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे आदी उपस्थित होते.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदेश लवकरचचाळीसगाव येथे नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत अत्याधुनिक फिरती प्रयोग शाळा आणि सिग्नल चौकात उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा या दोन्ही मागण्या आमदार उन्मेष पाटील यांनी मांडल्याचे सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी प्रयोग शाळेबाबत जागेवरच जिल्हाधिका-यांना सुचना दिल्या तर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याबाबत तातडीने बैठक घेऊन आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. अश्वरुढ पुतळ्याची फाईल सापडली असून हा प्रश्न लवकरच सुटेल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी अजून प्रतिक्षा करा, असेच सुतोवाच केल्याचा सूर यावेळी उमटला. मराठा आक्षणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वस्तू, दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरणयावेळी शासकीय जत्रेत सहभागी होऊन योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वस्तू, शाळांना ई - लर्निंग साहित्य, शेतक-यांना माती परिक्षण कीट, दाखले, प्रमाणपत्रे आणि आशा स्वयंसेविकांना सायकलींचे वाटप मंत्री पाटील यांनी केले. त्यांनी कृषि महोत्सव, शासकीय योजनांचे स्टॉल, ४३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, खाऊ गल्ली आदी स्थळांना भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले. 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावchandrakant patilचंद्रकांत पाटील