शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरकरांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:40 IST

दोन्ही आमदार व नगराध्यक्षांच्या पुढाकाराने शहरात बसणार शंभर सीसीटीव्ही कॅमेरे

ठळक मुद्देदोन्ही आमदार व नगरपालिकेने निधी देण्याची दर्शविली सहमतीबसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसरात बसविणार सीसीटीव्ही कॅमेरेपोलीस स्टेशनमध्ये तयार होणार नियंत्रण कक्ष

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.१- आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी न सोडणारे लोकप्रतिनिधी ज्यावेळी ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र येतात त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सुखद धक्का बसतो. अमळनेरातील दोन्ही आमदार व नगराध्यक्षांनी शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.गेल्या काही दिवसापासून शहरात चोºया, घरफोड्या, गर्दीच्या ठिकाणाहून वाहनांची चोरी असे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी बँकांमधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांकडून लंपास करणे, सोनसाखळ्या लंपास करणे आदी प्रकार वाढले होते. मुलींची छेडखानी, अवैध पार्किंग यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. मात्र निधीअभावी हे काम प्रलंबित होते. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मागणीनुसार शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी १० लाख रुपये , आमदार स्मिता वाघ यांनी ५ लाख रुपये व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेतर्फे ५ लाख रुपये असा २० लाखांचा निधी देण्यासाठी सहमती दर्शविली आहे.शहरात बसस्थानक, बाजारपेठ, मुख्य बँक, शाळा, वर्दळीच्या ठिकाणी १०० कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्याचे कंट्रोल युनिट पोलीस स्टेशनला राहणार आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून पोलिसांना शहरातील हालचाली टिपता येणार आहे. वाहन चोर , सोनसाखली लांबवणारे, रात्री चोºया करणारे तसेच टवाळखोरांचे चित्रिकरण घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी सर्वच विकासकामांसाठी एकत्र आल्यास तालुक्याचा विकास निश्चित होईल अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीAmalnerअमळनेरPoliceपोलिस