शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पथराड जि.प.शाळा झाली डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:30 IST

पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजीटल करण्याच्या केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पुढाकार घेतला. लोकवर्गणीच्या माध्यमातून नागरिकांनी या शाळेचा कायापालट केला.

ठळक मुद्देशाळेच्या भिंतीवर रेखाटले विविध चित्रे व अभ्यासक्रमचाळीसगाव रोटरीने केली मदतपालकसभेत झाली २६ हजारांची रक्कम जमाशिक्षक नंदू पाटील यांचा पुढाकार

कजगाव : पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजीटल करण्याच्या केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पुढाकार घेतला. लोकवर्गणीच्या माध्यमातून नागरिकांनी या शाळेचा कायापालट केला. विद्यार्थ्यांना चित्रस्वरूपात अभ्यासक्रम अभ्यासता यावा यासाठी शाळेची संरक्षक भिंत रंगविण्यात आली.पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजिटल व्हावी यासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने लोकनियुक्त सरपंच व भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली. शाळा डिजिटल करण्यासाठी सरपंचांनी मदत करण्याची तयारी दर्शविली.त्यानंतर तालुक्यातील गुढे येथील डिजिटल शाळेला भेट देण्यात आली. याठिकाणी असलेल्या प्रोजेक्टरची कल्पना पदाधिकाऱ्यांना आवडली. त्यानंतर दोन दिवसात पालक सभा घेण्यात आली. त्यात लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा डिजिटल करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी प्रकाश धुमाळ, दादा पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी प्रत्येकी ५००१ रुपयांची रोख रक्कम दिली. त्यानंतर उपस्थित पालकांनी आपापल्या परीने मदत केली. यानिमित्ताने २६ हजार रुपये रोख स्वरूपात जमा झाले. त्यानंतर उपस्थितांनी रोटरी क्लब चाळीसगावच्या पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम देण्याचे कबूल केले.एक महिन्यानंतर रोटरी क्लबने प्रोजेक्टर शाळेस दिला आणि आज शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे शाळेत गिरवू लागले.ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर आकर्षण चित्रे व अभ्यासक्रम रेखाटण्यात आला. शालेय इमारतीच्या बाहेरील भिंतीवर पण आकर्षक चित्रे काढण्यात आले. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील, सरपंच रंजना पाटील, मुख्याध्यापक एस.एफ . पाटील व शिक्षक नंदू पाटील, संजय पाटील यांनी पुढाकार घेत तो पूर्ण केला.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा