शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

अतिक्रमण पथकाला नागरिकांनी घेरले

By admin | Updated: February 4, 2017 00:47 IST

गुन्हे दाखल करणार : पिंप्राळा हुडकोत कारवाई न करता पथक माघारी परतले

जळगाव : रहिवासासाठी दिलेली जागा व्यवसायासाठी वापरणे, ज्या व्यक्तीच्या नावाने जागा दिली तो न रहाता दुस:याच व्यक्तीने तेथे व्यवसाय सुरू केला  असल्याचा प्रकार पिंप्राळा हुडकोत आढळून आल्याने तेथे कारवाईसाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. तणाव निर्माण झाल्याने वाद वाढू नये म्हणून कारवाई पथकाने तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, लवकरच सर्व तपासण्या करून या भागात कारवाई प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दूध फेडरेशन येथील झोपडपट्टीधारकांना तात्पुरत्या निवासासाठी पिंप्राळा हुडकोनजीक असलेल्या सुमारे 20 हजार स्केअर        फुटाच्या खुल्या भुखंडावर जागा देण्यात आली आहे. जवळपास 20 जणांना ही जागा रहिवासासाठी देण्यात आली होती. मात्र तेथे व्यवसाय सुरू केला असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या लक्षात आले.  त्यावरून या ठिकाणी हे पथक अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते.  20 जणांना पत्राची मागणी केली असता त्यातील काही जणांनी आरडाओरड सुरू केला.  मनपा पथक कारवाई करेल असे पाहून या ठिकाणी 200 ते 300 जणांचा जमाव एकत्र आला. आरडाओरड सुरू होऊन तणाव निर्माण झाल्याने मनपा पथकाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला. गुन्हे दाखल करणारआता याप्रश्नी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संबंधीतांना दिलेल्या पत्राची तपासणी करून एकाच्या नावावरील जागा दुसराच वापरत असल्यास संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांनी सांगितले. यासाठी विधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचेही ते  म्हणाले.  खंडेरावनगरात अतिक्रमणावर हातोडाखंडेराव नगरातील नाल्यानजीक असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने काढले. या परिसरातील नागरिकांनी   आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. आयुक्तांनी याप्रश्नी दोन दिवसात कारवाईचे आदेश दिले होते. या भागातील एका नागरिकाने भर रस्त्यात 10 ते 15 फुट पुढे येऊन झाडे लावली व त्याआड पत्र्याचे शेड बांधले होते. तक्रारीची दखल घेऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण शुक्रवारी दुपारी काढण्यात आले व रस्ता मोकळा करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली वसुलीपिंप्राळा हुडकोत नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत, त्यांना घरे मिळतील असे दाखवून पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली 190 रूपयांची वसूली केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला आह़े वसुली करणा:या महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कॉप्म्युटरसह त्यांचे साहित्य जप्त केले आह़े दरम्यान महापालिकेने दोघे आमचे कर्मचारी नसल्याचे सांगितल्याने वसूली करणारे नेमके कोण असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची चौकशी सुरू आह़े याबाबत माहिती मिळताच जाकीर पठाण यांनी महापालिकेतील अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकार कळविला़ मात्र अधिका:यांकडून योजनेबाबत कुठलेही सव्रेक्षण सुरू नसून महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नसल्याचे सांगितल़े एका वेल्डींगच्या दुकानात तिघांनी लॅपटॉपसह दुकान मांडल़े तिघे पोलिसांच्या स्वाधीन फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर सर्व नागरिकांनी गर्दी केली व महिलेसह दोघांना घेरल़े माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठल़े तिघांना सोबत घेत पोलीस ठाण्यात आणल़े नगरसेवक सुरेश सोनवणे, जाकीर पठाण यांच्यासह नागरिकांनी गर्दी केली़अर्ज भरलेल्या नागरिकांची गर्दीफसवणूकीच्या प्रकार असल्याचे समजताच पिंप्राळा हुडकोतील अर्ज भरून देणा:या नागरिकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली़ याप्रकरणी उशीरार्पयत पोलिसांची चौकशी सुरू होती़