शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी

By विजय.सैतवाल | Updated: March 21, 2023 19:04 IST

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी वाढून एकट्या  सुवर्णनगरी जळगावात २० कोटींच्यापुढे उलाढात होण्याचा अंदाज असून राज्यात हा आकडा तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.गेल्या १० ते १२ दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदरच सोने ६० हजारांच्या पुढे गेल्याने मुहूर्तावर भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी भारतात प्रत्येक सण, मुहूर्ताला महत्त्व दिले जात असल्याने गुढीपाडवा सणाला मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होऊन राज्यात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. आता मुहूर्तावर काय भाव राहतात याकडे लक्ष असले तरी खरेदी मात्र जोरात होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. 

कलाकुसरीच्या दागिन्यांना पसंती

सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून येत आहे. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जण जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती देतात. त्यानुसार या प्रकारासह  अनेक जण किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवणार असून कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाईनर पँडल या सोबत पुरुषांच्या सोनसाखळीचा सध्या अधिक ट्रेंड असल्याने त्यांची खरेदी वाढू शकते.  

असे वाढत गेले सोन्याचे भाव

१० मार्च- ५६,०००११ रोजी - ५७,५००१३ रोजी - ५७,८००१४ रोजी - ५८,१०० १७ मार्च - ५८,५०० १८ मार्च - ५९, ८००२० मार्च - ६०,२००

सध्या सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी त्यांना चांगली मागणी असून गुढीपाडवा सणाला आणखी खरेदी वाढणार आहे. - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :Jalgaonजळगावgudhi padwaगुढीपाडवाGoldसोनं