शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 2:52 PM

मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल झालेले आहेत.

ठळक मुद्देपवित्र रमजान पर्वात ग्राहकांकडून होतेय मागणीइराण, सौदी अरेबियातून खजूर झाली आयातरोजा सोडण्यासाठी होतो वापर

वासेफ पटेलभुसावळ , जि.जळगाव : मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल झालेले आहेत.भुसावळच्या मुस्लीम बहुल जाममोहल्ला, खडकारोड, अमरदीप टॉकीज परिसरात आणि काही मोठ्या व्यावसायिकांकडे अशा विदेशातील खजूर विक्रीसाठी आणि खास करून पवित्र रोजा सोडण्यासाठी मागविण्यात आल्या आहेत.दिवसभर म्हणजे सूर्योदयाच्या आधीपासून ते सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवणारे समाज बांधव, महिला, लहान मूल, मुली अन्नपाण्याचा एक थेंबसुद्धा घेत नाहीत. यामुळे दिवसभरात जो अशक्तपणा आलेला असतो तो दूर व्हावा याकरिता पेंड खजूरचे सेवन करून रमजानचा रोजा सोडण्याची आधीपासूनची प्रथा आहे. पेंडखजूरचे सेवन केल्याने शरीराचा अशक्तपणा दूर होतो. यासाठी रोजा सोडण्यासाठी भुसावळच्या बाजारपेठेत १५ ते २० प्रकारच्या पेंडखजूर विदेशातून मागविण्यात आल्या आहेत. त्यांना या काळात मोठी मागणी मिळत आहे.भुसावळ शहरातील मुस्लीम बहूल अमरदीप चौकामध्ये पवित्र रमजानच्या काळात रोज सायंकाळी पाच ते रोजा इफ्तारपर्यंत दीड तासांमध्ये पेंडखजूर शिवाय रोजा इप्तारीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.या ठिकाणी हा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात येतो.खजूरच्या किमतीत वाढमागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेंडखजूरच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधी खजूर प्रतिकिलो ८० रुपये, खनिजी प्रतिकिलो २०० रुपये, इराणी खजूर १२० ते १५० रुपये किलो, सलार २६० प्रतिकिलो, बाहमन ३०० रुपये प्रति किलो, ब्लॅक सायर २४० ते ३०० रुपये किलो, बरारी १४० ते १९० रुपये किलो, केमिया २३० ते ३०० रुपये किलोपर्यंत, रसगुल्ला २४० रुपये किलो, रब्बी ३०० रुपये किलो, मगरूम ५०० रुपये किलो, कलमी ८०० रुपये किलो. याप्रमाणे खजूर भुसावळच्या बाजारात विकली जात आहे.पवित्र रमजान महिन्यासाठी भुसावळच्या व्यापाºयांनी मागविलेली चांगल्या दर्जाची खजूर ही अरब देश इराण, सौदी अरेबिया येथून मागविण्यात आली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. भुसावळ शहरातील खास करून अमरदीप चौक आणि सुभाष पोलीस चौकी चौक, रजा टॉवर परिसरात रमजान काळात खजूर आणि अन्य खाद्यपदार्थ घेण्यासाठी समाजबांधवांची मोठी पसंती असते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ