शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शिक्षकांचे पगार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:23 IST

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित बेमुदत शालेय कामकाज बंद आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा देत भडगाव शहरातील लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय तसेच कोळगाव येथील गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी भर पावसात एकत्रित येऊन अध्यापन करणाºया शिक्षकांना शासनाने तत्काळ १०० टक्के पगार सुरू करण्यात यावा म्हणून निवेदन दिले.

ठळक मुद्देभडगाव तहसीलदारांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे निवेदनशैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये

भडगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित बेमुदत शालेय कामकाज बंद आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा देत भडगाव शहरातील लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय तसेच कोळगाव येथील गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी भर पावसात एकत्रित येऊन अध्यापन करणाºया शिक्षकांना शासनाने तत्काळ १०० टक्के पगार सुरू करण्यात यावा म्हणून तहसीलदार गणेश मरकड तसेच गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना निवेदन दिले.राज्यातील सर्व विनाअनुदानित तत्त्वावर कार्य करणारे उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षकांच्या वेतन व अनुदान संबंधीच्या मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शिक्षकांनी संप पुकारलेला आहे. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ष जीवनाला कलाटणी देणारे असून, आमचे शैक्षणिक दिवस वाया जात आहे.तरी गेल्या १७ ते १८ वर्षांपासून विनावेतन आपली निष्काम सेवा बजावणाºया महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी ठोस सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागावा. आम्ही सर्व विद्यार्थी या विनाअनुदानित संस्थामधून ग्रामीण भागात शिक्षण घेत आहोत. आमच्या शिक्षकांना अनेक वर्षांपासून पगार नसल्याने उच्चशिक्षीत शिक्षकांना वेठबिगारीचे जीवन जगावे लागत आहे ही बाब पुरोगामी तसेच प्रगतशील महाराष्ट्रास अशोभनीय आहे.तरी शासनाने १४ आॅगस्ट २०१९ पर्यंत आमच्या शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा न काढल्यास शासनाच्या उदासिन तसेच अन्यायकारक धोरणाविरोधात आम्हा विद्यार्थ्यांवर नाईलाजास्तव रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात मांडण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणBhadgaon भडगाव