शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गाळ्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:33 AM

जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. विधितज्ज्ञांशी ...

जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. विधितज्ज्ञांशी विचार विनिमयानंतर गाळ्यांच्या नूतनीकरणासाठी कोणत्याही अडचणी नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मंगळवारी महापौरांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून. लवकरच हा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली.गाळेधारकांचा प्रश्न हा गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असून, यामुळे मनपा प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सध्या लॉकडाऊमुळे मनपासमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनची परिस्थिती अजून किती महिने राहू शकते याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत गाळेधारकांच्या मागणीनुसार गाळ्यांचे नूतनीकरण झाल्यास मनपाला मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम मिळू शकते. दरम्यान, मंगळवारी फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी महापौर भारती सोनवणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भाजप महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांच्यासह सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन अध्यक्ष रमेश मतानी, बबलू समदडिया, दीपक मंधान, फुले मार्केट असोसिएशनचे राजेश वरयानी, बाबूसेठ कौरानी आदी उपस्थित होते.२३९ गाळेमालकांनी भरले ८६ कोटीमनपाने नव्याने बील आकारणी केल्यानंतर सेंट्रल फुले मार्केट आणि महात्मा फुले मार्केटमधील २३९ गाळे धारकांनी अगोदर १८ कोटी आणि नंतर ६८ कोटी असे ८६ कोटी रुपये भरले आहे. २३९ गाळेधारकांनी मनपात पूर्ण थकबाकी जमा केल्यानंतर तसा दाखलादेखील घेतला आहे. उर्वरित व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी ४ कोटींचा भरणा केला आहे.तर वर्षाला मिळणार ५५ कोटींचा महसूल... मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातून पूर्वी ६ कोटींचा महसूल मिळत होता. आज सर्व व्यापारी संकुलातील गाळ्यांचे नुतनीकरण केल्यास मनपाला तब्बल ५५ कोटींचा वार्षिक महसूल मिळू शकणार आहे. गाळे नूतनीकरण केल्याने मनपाला मिळणाºया महसुलातून शहराच्या विकासाचा अडसर दूर होणार असल्याचे मत महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केले.नव्याने मूल्यांकन केल्यानंतर देण्यात आले बिलेमनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना २०१४ मध्ये भाड्यापोटी बिले पाठविण्यात आली होती. बील आकारणी अव्वाच्यासव्वा असल्याने सर्वांनी भरण्यास नकार दिला. गाळेधारकांनी न्यायालयातदेखील धाव घेतली होती. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी मनपात घेण्यात आलेल्या महासभेत शासनाच्या निदेर्शानुसार तयार करण्यात आलेला ठराव क्रमांक ११२ मंजुर करून गाळ्यांचे नव्याने मूल्यांकन करून गाळे धारकांना नव्याने बील आकारणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव