शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला दिली जाते कैद्याप्रमाणे वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:41 IST

कोविड रुग्णालयातील गंभीर प्रकार : २४ तासात महिलेवर उपचारच नाही

जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोरोना रुग्णालयात रुग्णांची अवहेलना व हेळसांड सुरुच असून कैद्यांप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाच्या या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गंभीर व आॅक्सिजन लावलेल्या रुग्णांना देखील स्वत: उठून डॉक्टरांच्या टेबलकडे जावून औषधी व गरम पाणी घ्यावे लागत असल्याने संतापात आणखीनच भर पडली आहे.रुग्णालयातून सुटका झालेल्या एका वृध्द महिलेच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ ला दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांनी हा प्रकार डोळ्यांनीही बघितला व रुग्णानेही त्यांच्याकडे कथन केले. ६० वर्षीय या महिलेला कोविड रुग्णालयात २५ रोजी दाखल करण्यात आले. २८ रोजी सायंकाळी या रुग्णाला नातेवाईकांना कोणतीही पूर्वसूचना न देता घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णाची नवीन चाचणी घेण्यात आली नाही, त्यामुळे हा रुग्ण पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह हे कळायला मार्ग नाही. तशाच परिस्थितीत सुटका करण्यात आली. या चार दिवसाच्या काळात पहिल्या २४ तासात तर कोणतेही उपचार या रुग्णावर झाले नाहीत. डॉक्टर, परिचारिका यांच्याकडे खेटा मारल्यानंतर कुठे उपचाराला सुरुवात झाली. ही वृध्दा अतिशय गंभीर होती. पोटात अन्नाचा कण नाही, त्यामुळे प्रचंड अशक्तपणा आलेला. तोंडातून शब्दही निघणे अवघड असताना त्यांना देखील जागेवर गरम पाणी व औषधी मिळाली नाही. या वॉर्डात मध्यभागी एक टेबल ठेवलेला असून त्यावर गरम पाणी व औषधी ठेवण्यात येते. परिचारिका किंवा परिचर ह्या कारागृहात कैद्यांना ज्या पध्दतीने आवाज देऊन बोलावले जाते, त्याच पध्दतीने रुग्ण क्रमांक अमूक असे नाव पुकारुन बोलावले जाते व टेबलावरील औषधी स्वत: ला घ्यावी लागते. डॉक्टर, परिचारिका व परिचर रुग्णाजवळ जावून उपचार करण्याची तसदी घेत नसल्याचे या रुग्णाने सांगितले.दांडगा वशिला असला तरच कामया रुग्णालयात दांडगा वशिला असला तरच रुग्णाला उपचार मिळतात, किंवा त्यांना अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयात पाठविले जाते. अन्यथा सामान्य रुग्णाने तर स्वप्नही पाहू नये अशी अवस्था आहे. दुसरी बाजू या रुग्णाने अशीही सांगितली की, गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचेच रुग्ण हाताळले जात असल्याने डॉक्टर व इतर स्टाफ कंटाळला आहे. काम करणारे डॉक्टर, कर्मचारी बिचारे जीवाची पर्वा न करता पुण्य समजून सेवा देत आहेत, आणि दिखावा करणारे दिखावाच करीत आहेत, त्यामुळे देखील नाराजीचा सूर आहे.राज्यभर बदनामी, तरीही सुधारणा नाही !जिल्हा कोरोना रुग्णालयातून वृध्द महिला बेपत्ता होणे व नंतर तिचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून येणे, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या डॉक्टरांनी ढुंकून न पाहणे यामुळे रुग्णालया व जळगावाची राज्यभर बदनामी झाली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा यात बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव