शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर परिचारिका करतेय रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:19 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सध्याच्या ‘कोरोनामय’ वातावरणात तळोदा तालुक्यातील गरोदर परिचारिका रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांच्याविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे तळोदा येथील वार्ताहर वसंत मराठे...

कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत रूग्ण सेवेला प्रधान्य देऊन नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका गरोदर असतानाही रूग्णांची तपासणी करून रूग्ण सेवा करीत आहेत. तिच्या या स्तुत्य कामाचे कौतुक केले जात आहे.प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अश्विनी प्रताप पावरा ही महिला परिचारिका २०१७ पासून कार्यरत आहे. सध्या ही परिचारिका गरोदर आहे. तथापि, देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य महामारीने अक्षरश: कहर केला आहे. देशभरात दिवसागणिक रूग्ण संख्येतदेखील मोठी वाढ होत आहे. जीवघेणा रोग असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. साधा, ताप, खोकल्याचा त्रास रूग्णाला जाणवू लागला तरी रूग्णांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. प्रतापपूर आरोग्य केंद्रात अशी लक्षणे असलेले रूग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. अशा रूग्णांची तपासणी ही परिचारिका करीत आहे. घाबरलेल्या या रूग्णांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यांना काळजी घेण्याबाबतचे समुपदेशनदेखील त्या करीत आहेत. एवढेच नव्हे तर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या रूग्णांना पुढील तपासणीसाठी त्या आमलाड येथे पाठवित असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर प्रत्येक रूग्णाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घरात स्वच्छता पाळा, एका-एका तासाने साबणाने हात धुवा, खोकलताना व शिंकतांना तोंडाला रूमाल लावा, आपले घर परिसर स्वच्छ ठेवून घराबाहेर पडू नका. त्यामुळेच कोरोनाला प्रतिबंध घालता येईल, असा सल्लादेखील त्या रूग्णांना देत असतात. वास्तविक त्या गरोदर आहेत, असे असतांना केवळ देशासमोरील संकट लक्षात घेऊन आणि रूग्णांची सेवा करण्याच्यव हेतूने अशा परिस्थितीत काम करीत आहेत. साहजिकच त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात असून, रूग्णांच्या काळजीबरोबरच त्या आपली काळजीदेखील घेत आहेत. सोबत आपल्या कुटुंबाचीदेखील काळजी घेत आहे. त्यांच्या रूग्णसेवेस कुटुंबाचाही प्रतिसाद मिळत असल्याचे त्या सांगतात.कोरोना या घातक रोगामुळे रूग्णांमध्ये मोठी भीती पसरली आहे. ताप, सर्दी असलेले रूग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असतात. तेव्हा ते घाबरलेले असतात. त्यांची भिती कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते. त्यामुळे त्यांच्यातील भिती कमी होऊन घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत काळजी घेत असतात.-अश्विनी पावरा,परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रतापपूर, ता.तळोदा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव