जळगाव : महाराष्टÑ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१८ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र याआधी राज्यसेवा परीक्षा २०१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३७७ उत्तीर्ण अधिकाऱ्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही.या ३७७ अधिकाºयांचे प्रशिक्षण आॅगस्ट २०१८ पासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अधिकाºयांच्या निकालाला आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल झाली. या वेळी सामान्य प्रशासन विभागाने केवळ आक्षेप घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या थांबवण्या ऐवजी सर्वच ३७७ जणांना नियुक्त्या न देण्याची भूमिका घेतली. ही भूमिका इतर उमेदवारांवर अन्यायकारक ठरली. या केससंदर्भात सुनावणी आॅक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झालेली आहे.या प्रक्रियेदरम्यान झालेल्या प्रशासकीय दिरंगाईमुळे सर्व उमेदवारांना आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक कुचंबनेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिफारसपात्र उमेदवारांनी आपल्या मागण्या सरकार आणि प्रशासनासमोर मांडण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सेवा २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी जळगाव येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली व प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. यावर मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली.
राज्यसेवा परीक्षा २०१७ मध्ये उत्तीर्ण अधिकारी अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:31 IST
जळगाव : महाराष्टÑ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१८ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र याआधी राज्यसेवा ...
राज्यसेवा परीक्षा २०१७ मध्ये उत्तीर्ण अधिकारी अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच
ठळक मुद्दे२८ रोजी आझाद मैदानावर साखळी उपोषणउपोषणात उमेदवारांचे पालकही होणार सहभागीसामान्य प्रशासन विभागाची भूमिका अन्यायकारकप्रशासकीय दिरंगाईउत्तीर्ण उमेदवारांनी घेतली मंत्र्यांची भेट