शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, स्टेशनावर सामानाच्या ‘ने-आण’साठी आता जादा पैसे द्यावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:47 IST

जळगाव : रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल बांधवांच्या भाडेवाडीत सोमवारपासून वाढ करण्यात येणार आहेत. यामध्ये लहान स्टेशनपासून ...

जळगाव : रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल बांधवांच्या भाडेवाडीत सोमवारपासून वाढ करण्यात येणार आहेत. यामध्ये लहान स्टेशनपासून ते मोठ्या स्टेशनपर्यंत प्रवाशांना प्रती व्यक्ती एका फेरीसाठी ६० ते ६५ रूपये मोजावे लागणार आहेत.गाडीतून उतरल्यानंतर स्टेशनबाहेर सामानाची ने-आण करण्यासाठी किंवा स्टेशनामध्ये सामान नेण्यासाठी प्रवाशांना तेथील हमाल बांधवांची मदत घ्यावी लागते. रेल्वेच्या नियमानुसार योग्य ते भाडे घेऊन हमाल बांधव सामानाची ने-आण करित असतात. दरम्यान, वाढत्या महागाईनुसार या भाडेवाढीमध्ये वाढ करण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून हमाल बांधवाची मागणी सुरू होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून, २० जुलैपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.ही भाडेवाढ करतांना रेल्वे प्रशासनाने मोठे स्टेशन, मध्यम व लहान स्टेशन या नुसार भाडेवाढीचे दर लागू केले आहेत.यामध्ये भुसावळ, जळगाव व चाळीसगाव स्टेशनवरून सामानाची ने-आण करतांना प्रती प्रवासी ४० किलो वजनापर्यंत ६५ रूपये मोजावे लागणार आहेत. मध्यम स्टेशन असलेल्या पाचोरा, रावेर व धुळे स्टेशनवर प्रती प्रवासी ४० किलो वजनापर्यंत ६० रूपये आकारण्यात येणार आहेत. तर लहान स्टेशनवरूनही ४० किलो वजनापर्यंत ५५ रूपये आकारण्यात येणार आहेत.तसेच स्टेशनामध्ये दुचाची किंवा चारचाकी नेण्यासाठी १०६ रूपये भाडे आकारण्यात येणार असून, दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरने ने-आण करण्यासाठींही भाडे आकारण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव