शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एकुलता मुलगा गेला, आधार हरवला! सेंधव्याजवळील घटना

By विलास.बारी | Updated: July 16, 2023 21:43 IST

अपघातात ठार झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार, गंभीर रुग्णाला इंदूरला हलविले

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: येथून सिहोर येथे जाणाऱ्या तरुणांच्या वाहनाचे टायर सेंधवा जवळ फुटून झालेल्या अपघातात ठार झालेल्या सूरज रामेश्वर जामोळकर (२४, रा. तुकाराम वाडी) या तरुणावर रविवारी जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरज हा एकुलता एक मुलगा, त्याच्या जाण्याने जामोळकर कुटुंबाचा आधार हरवला आहे. यातील प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाला इंदूर येथे हलविले असून इतर तीन तरुणांवर जळगावात उपचार सुरू आहे.

जळगाव शहरातील तुकारामवाडीत सूरज जामोळकरसह त्याचे मित्र शनिवार, १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता चारचाकी वाहनाने (एम एच १९, डीजे ७७७३) सिहोर येथे जाण्यासाठी निघाले. त्या दरम्यान संध्याकाळी सेंधवाजवळ वाहनाचे टायर फुटले व हे वाहन उलटले. या अपघातात वाहनातील सहापैकी सूरज जामोळकर हा तरुण जागीच ठार झाला. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकुलता एक मुलगा

मयत सूरज याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील एलईडी दिवे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने जामोळकर कुटुंबाचा आधारच हरवला आहे. त्याचा मृतदेह आणल्यानंतर कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता.

टॅग्स :Accidentअपघात