शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बालिकेस पालक रुग्णालयात सोडून गेल्याने पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:39 IST

रडणाऱ्या बालिकेचा परिचारिकांनी केला संभाळ

जळगाव : चार वर्षीय बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोडून पालक घरी निघून गेल्याने रुग्णालयात चांगलीच पळापळ झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी घडला. अखेर संध्याकाळी हे पालक परतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. या दरम्यान तब्बल तीन तास रडणाºया या बालिकेचा परिचारिकांनी संभाळ केला व पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पालक परतल्याने या प्रकरणास पूर्णविराम मिळाला.गुुरुवारी दुपारी १.१० वाजता नंदा संजय पाटील (४, रा. रायपूर, ता. जळगाव) या बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालिकेवर बाल रुग्ण कक्षात (वॉर्ड क्रमांक ४) उपचार सुरू करण्यात आले. मात्र या दरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास बालिकेचे पालक रुग्णालयातून निघून गेले.रुग्णालयात बालिका रडत आहे तरी पालक का लक्ष देत नाही, या बाबत परिचारिकांनी चौकशी केली असता बालिकेचे पालक कोठेच आढळून आले नाही. रुग्णालयात पालकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसादही मिळत नव्हता. त्यामुळे बालिकेला सोडून पालकांनी पलायन केल्याचा कयासही लावला जात होता. अखेर पावणे सात वाजेच्या सुमारास या बाबत पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असतानाच सात वाजेच्या सुमारास पालक पुन्हा रुग्णालयात अवतरले व सर्वांना दिलासा मिळाला.सदर कुटुंबास सुरत येथे जायचे असल्याने ते घरी पैसे घेण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात येत होते. मात्र एवढ्या लहान मुलीला रुग्णालयात एकटे सोडून गेल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात होते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव