जळगाव- अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे़ त्यामुळे शहरासह ग्रामीण जीवनाही विस्कळीत झालेले आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मंगळवारी कुलगुरूंना निवेदन देवून करण्यात आली आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांची मंगळवारी सकाळी अभाविपच्या शिष्टमंडळाने भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी शिष्टमंडळात विराज भामरे, कल्पेश पाटील, आदित्य नायर, प्रज्वल पाटील, तुषार पाटील, योगेश महाले, शुभम पाटील, वैभव महाजन, विश्वजित गायकवाड, धिरज पाटील, जयेश माळी, गौरव देवकर यांचा समावेश होता. चर्चेनंतर कुलगुरूंना निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ यामुळे शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडला आहे़ तर विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ म्हणून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे़ अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:34 IST