शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाखांचा पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त; तिघांविरूध्द कारवाई

By सागर दुबे | Updated: May 6, 2023 15:41 IST

जळगाव-भुसावळ रस्त्यावरील गोडावूनवर पोलिसांची धाड

जळगाव : शहरातील जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका गोडावूनवर शुक्रवारी रात्री परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना शुक्रवारी रात्री जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका दुचाकी शोरूमच्या मागील भागातील गोडावूनमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मानमसाला आणि तंबाखूचा माल साठवून ठेवण्यात आला आहे.

त्यानुसार पवार यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास गोडावूनवर धाड टाकली. त्याठिकाणी तीन जण मिळून आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची अमोल तुकाराम वनडोळे (२८, रा.शिरसोली प्र.बो.), विनायक शालिक कोळी (४७,रा.वाल्मिक नगर), भूषण दादा तांबे (३८,रा.शिवाजीनगर) अशी नावे सांगितली. तिघांविरूध्द बेकायदेशीररित्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याप्रकरणी भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(१),२६ (२)(४), २७ (३)(डी), २८ (३)(ई), ५८,५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असा आहे जप्त माल...

पोलिसांनी तिघांविरूध्द कारवाई केल्यानंतर गोडावूनची झडती घेतली. त्यामध्ये १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचे पानमसाले ११४० पाकिटे आणि सुंगधित तंबाखूचेही ११४० पाकिटे, १ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ७०० पाकिटे, १५ हजार ४०० रूपये किंमतीचे व्ही-१ तंबाखूचे ७०० पाकिटे तसेच १ लाख २८ हजार ६४० रूपये किंमतीचे आरएमडी पानमसाल्याचे २६८ पाकिटे पोलिसांना मिळून आले. असा एकूण ४ लाख ५३ हजार ६४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.यांनी केली कारवाई...

पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार, एमआयडीसीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, दीपक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, विठ्ठल धनगर, गोपाल पाटील, महेश पवार, हितेश महाजन, भगवान सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे. तर तपासणीसाठी पानमसाला व तंबाखूचे सॅम्पल देखील पोलिसांनी घेतले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव