शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 13:13 IST

सामान्य कार्यकर्त्याच्या मदतीसाठी उभी राहिली सोशल मीडियावर चळवळ

ठळक मुद्देकर्करोगाच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सोशल माध्यमाच्या टचस्क्रिनवर माणुसकीची चळवळच कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता मोठ्या मनाने सहभागी

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागेल... एवढे मी भोगिले की मज हसावे लागेल... कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे आपल्या व्यथा व वेदनांचा असा प्रांजळ हिशोब गाठीशी बांधून एका सामाजिक कार्यकर्त्याने बुद्धाचा धम्म पुजीला. वस्तीतल्या पोरांचीही धम्माबरोबरच संगिती बांधली. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या कार्यकर्त्याने कर्करोगाच्या वादळाशी युद्ध पुकारले आहे. त्यांच्या याच चांगुलपणाला सलाम करताना त्यांना कर्करोगाच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सोशल माध्यमाच्या टचस्क्रिनवर माणुसकीची चळवळच उभी राहिली आहे.जळगावच्या शिवाजी नगरातील महामाया बौैद्ध विहाराच्या माध्यमातून एक संस्कारित पिढी घडविणाºया अवलिया सुकलाल पेंढारकर याची ही कहाणी. बौद्ध विहाराच्या आजूबाजूला राहणाºया लोकांचे वैशिष्ट म्हणजे सर्व जण निव्यर्सनी. मोलमजुरी करतात. दररोज सायंकाळी कामे आटोपली की ही मंडळी पाच - दहा मिनिटासाठी एकत्र येतात. इथले पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी धम्माचे वाचन करीत असतात. या सर्वांमागे उभा आहे तो सुकलाल पेंढारकार नावाचा साधा कार्यकर्ता.फक्त दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेले पेंढारकर हे जळगावच्या रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करतात. दरवर्षी ते बौद्ध परिषद ते घेत असतात. पण याची कुठेच प्रसिद्धी नाही कि फोटोसेशन नाही.जनसेवेचे व्रत घेतलेल्या या कार्यकर्त्यांला दोन वर्षापूर्वी हातदुखीचा त्रास सुरु झाला. आजाराकडे दुर्लक्ष करुन सुकलाल यांची समाजाच्या भल्यासाठी भ्रमंती सुरु होती. याच भ्रमंतीने पुढे डोके वर काढले. हाताला गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची तपासणी केली तर ती कॅन्सरची निघाली. हे ऐकून पेंढारकर कुटुंबियांवर जणू आकाश कोसळले. जवळ पैशाचा पत्ता नाही. समोर फक्त अंधार. याही परिस्थितीत सुकलाल यांच्या भावाने आपल्याकडे होता तेवढा पैसा खर्च केला. आठ केमोथेरपी झाल्या.शेवटी रेडीएशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यासाठी अर्थात पैसा लागणार होता. अशा अवस्थेत आपले राहते घर गहाण ठेवायचे, असा निर्णय त्यांनी घेतला. सुकलाल यांचे मित्र आणि बीएसएनएलमधील कर्मचारी किशोर बिºहाडे यांनी त्यास असे न करण्याचा सल्ला दिला.या दरम्यान, बिºहाडे यांची भुसावळ पंचायत समितीमधील शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सुकलाल यांच्याविषयी सांगितले. अहिरे यांनी सर्व गोष्टींची खातरजमा करुन सोशल मिडीयावर मदतीची हाक दिली. या हाकेला जोरदार प्रतिसाद मिळाला. अगदी साध्या कर्मचाºयापासून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांपर्यंत सर्वांनी आपला वाटा उचलला आणि आणि बघता - बघता १४ दिवसात सव्वा लाखाची रक्कम जमा झाली.गेल्याच महिन्यात सुकलाल पेंढारकर पुण्याच्या रुबी इस्पितळात दाखल झाले. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. पुढील महिन्यात आपण जळगावला येऊ आणि पुन्हा एकदा आपले सामाजिक कार्य सुरु करु, असा त्यांचा निर्धार आहे.जळगावात अनेक वेळा मोर्चे निघतात आणि आंदोलने होत असतात. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना सुकलाल पेंढारकर यांची आठवण होते. कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता पेंढारकर हे मोठ्या मनाने यात सहभागी व्हायचे आणि आंदोलनाच्यावेळी झालेली गर्दीमागे सुकलाल पेंढारकर असायचे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही.पण याच सुकलाल आप्पांवर ज्यावेळी वेळ आली त्यावेळी कुठलीही संघटना पुढे आली नाही की त्यांच्या आजारपणाविषयी कुणी चौकशी केली नाही, मदत तर दूर राहिली. कुणाकडेही मदतीची अपेक्षा न करता हा साधा कार्यकर्ता आजाराशी लढत राहिला आणि आता आजारावर मात करुन एक संस्कारीत पिढी घडविण्यासाठी पुन्हा एका जोमाने तयार होत आहे.... 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJalgaonजळगाव