पहूर पोलीस स्टेशन जळगाव जिल्ह्यात नेहमी चर्चेत राहणारे आहे. गेल्या नऊ महिन्यांत दोनदा अधिकाऱ्यांचे बदली सत्र याठिकाणी घडले. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी प्रथमच पहूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दर्जाचे राहुल खताळ यांची ५ नोव्हेंबर २०२० रोजी नियुक्ती केली. ही नियुक्ती कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून असल्याचे आदेश होते. खताळ यांनी सात महिन्यांच्या कालावधीत मुंडेंचा निर्णय सार्थ ठरविला; पण खताळ यांच्या विनंतीवरून जून महिन्यात २०२१ मध्ये बदली झाली. यांच्या जागेवर सपोनि स्वप्नील नाईक यांची नियुक्ती झाली. यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू दिले नाही व बदलीचे कारण नसतानाही मंगळवारी मध्यरात्री नाईक यांच्या बदलीचे आदेश धडकले. त्यांच्या जागेवर मुंडे यांनी पुन्हा पोलीस निरीक्षक दर्जाचे मानव संसाधन जळगाव विभागातील अरुण काशीनाथ धनवडे यांची नियुक्ती केली. त्यांच्या आदेशातही कायदा सुव्यवस्था याचे कारण नमूद करण्यात आले आहे.
पहूरचे सपोनि नाईक यांची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST