शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘पबजी’ चं लागलयं याड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:44 IST

तरूण मंडळी या गेमच्या विळख्यात

सागर दुबे‘पबजी’ या आॅनलाईन गेमचे अक्षरक्ष: तरूणाईसोबतच लहान मुलांना याड लागलयं़ दिवस-रात्र तरूण मंडळी या गेमच्या विळख्यात अडकल्यामुळे पालकांच्या डोकेदुखी बनली आहे़ महाविद्यालयाचा कट्टा असो किंवा गल्ली बोळ, या आपल्या वैयक्तिक खोलीत लहान मुलांसह महाविद्यालयीन तरुण तासं-तास हा गेम खेळतानाचे चित्र बघायला मिळत आहे़सोशल मीडीयाचा वापर आज मोठ्या प्रमाणावा होताना दिसून येत आहे़ सोशल मीडीयासोबतच आॅनलाईन गेमचीही तरूणाईमध्ये क्रेझ आहे़ मध्यंतरी, पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या आॅनलाईन गेमचे मुलांना वेड लागले होते़ आता यामध्ये तब्बल एक जीबीचा असलेला पबजी गेमने भर पाडली आहे़ विविध टास्क, मारधाड अन् आकर्षक व्हिज्युअल्स आणि अ‍ॅक्शनमुळे हा गेम तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. हा गेम ग्रुप-ग्रुपने करून खेळला जात असतो़ यात चॅटींग आणि कॉलींगद्वारे खेळून मुलं गेम खेळण्याचा आनंद घेतात़ विशेष म्हणजे, हा गेम अठरा वर्षांवरील मुलांसाठी आहे़ पण लहान मुलेही मोठ्या प्रमाणात हा गेम खेळत आहेत़ गेमची एवढी क्रेझ वाढली आहे़ रात्री दोन-दोन वाजेपर्यंत तरूण मंडळी ही आपल्या वयक्तीक खोलीत बसून गेम खेळत आहेत़ याचा विपरित परिणाम सध्या गेम खेळणाऱ्या तरूणांवर दिसत आहे़ सध्या परीक्षा सुरू आहे़ पण, अभ्यास न करता रात्री उशिरापर्यंत लहान मुलं सुध्दा एका कोपºयात बसून गेम खेळत असल्यामुळे पालकांना डोके दुखी ठरत आहे़ दरम्यान, या गेममधील विविध खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेहमीच अशी गेम का बनवली जातात ती मुलांच्या मनावर परिणाम करून जातात़ पोकेमॉन तसेच ब्ल्यू व्हेल या गेममुळे अनेक घटना घडल्या आहेत़ मनावर आणि आरोग्यावर प्रभाव करणाºया अशा खेळांपासून पालकांनी मुलांना दुर ठेवणे गरजेचे आहे़ अन्यथा पुढची पिढी ही भावनाहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पालकांनी देखील मुलांना विचार करूनच मोबाईल दिला पाहिजे अन् ज्यामुळे आपल्या पाल्याच्या आरोग्यावर परिणाम होईल अशा गेम्सपासून पाल्याला दूर ठेवले पाहिजे़

टॅग्स :onlineऑनलाइनJalgaonजळगाव