ऑक्सिजन सिलिंडरच्या बॅकअपने २४७ रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:13+5:302021-05-14T04:17:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत अपेक्षित असलेला लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर ...

Oxygen cylinder backup saves 247 patients | ऑक्सिजन सिलिंडरच्या बॅकअपने २४७ रुग्णांना जीवदान

ऑक्सिजन सिलिंडरच्या बॅकअपने २४७ रुग्णांना जीवदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत अपेक्षित असलेला लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर न आल्याने ऑक्सिजनचा साठा संपला होता. रुग्णालय प्रशासनाने अखेर आपत्कालीन स्थितीत ठेवलेला बॅकअप उपयोगात घेत मोठे संकट टाळण्यात यश मिळविले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, ऑक्सिजन समितीचे डॉक्टर्स यावर रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेवून होते. रुग्ण सुखरूप असल्याची माहिती डॉ. रामानंद यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ११ मे रोजी लिक्विड ऑक्सिजन टँकर आला होता. यात १६ टन लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आले होते. हे ऑक्सिजन गुरुवारी संध्याकाळी संपण्याची शक्यता होती. नियमितचा टँकर न आल्याने टँकमधील ऑक्सिजन जसजसे कमी होत होते तसतसे यंत्रणेसमोरील संकट वाढत होते. मात्र, तातडीने परिस्थितीचा आढावा घेत टँक ०.२ अशा स्थितीत असताना पाच मॅनफोल्डमधून शंभर सिलिंडरद्वारे ऑक्सिजन रुग्णांना पुरवठा सुरू करण्यात आला. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही धावपळ सुरू झाली होती. उपवैद्यकीय अधीक्षिका डॉ. संगीता गावित, ऑक्सिजन समितीचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. मंदार पाटील, डॉ. समीर चव्हाण, डॉ. सतीश सुरडकर यांच्यासह भांडारपाल संजय चौधरी, यशवंत राठोड, गजानन चौधरी, अनिल पाटील हे रात्री उशिरापर्यंत थांबून होते.

अशी आहे यंत्रणा

रुग्णालयात टँक रिकामा होण्याआधी ज्या ५ पाॅइंटवरून पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा व्हायचा त्याच पद्धतीने गुरुवारी रात्री शंभर सिलिंडरच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आला. शंभर सिलिंडर तीन तास पुरवठा करतील, त्यानंतर शंभर सिलिंडर असून, आणखी शंभर सिलिंडर आम्ही भरून आणू, असा ९ ते दहा तासांचा बॅकअप सद्यस्थितीत असल्याचे डॉ. रामानंद यांनी यावेळी सांगितले.

असे रुग्ण

एकूण रुग्ण ३२२

टँकद्वारे पुरवठा होणारे रुग्ण २४७

सिलिंडरद्वारे पुरवठा होणारे रुग्ण ७५

गुरुवारी टँक शून्यावर आल्याने २४७ रुग्णांना सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला.

सीटू व सीथ्री कक्षाला

टँकरचा संपर्क होईना

धुळे ते जळगावदरम्यान असताना टँकरचा संपर्क तुटला होता. साधारण तासभर टँकरशी संपर्क होत नव्हत. मात्र, टँकरसोबत पोलीस यंत्रणा व अधिकारी असल्याचे सांगण्यात येत होते. रात्री बारा वाजता हा टँकर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

कोट

९ मेट्रिक टनचा रिझर्व्ह साठा जिल्ह्याकडे आहे. मात्र, तो अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची परवानगी आहे. टँकर येणारच होता, याची शास्वती असल्याने चार तासांचा वेळ हा सिलिंडर उपलब्ध असल्याने त्यावर काढायचा होता. हा नियाेजनाचा एक भाग आहे. टँकर धुळे ते जळगावच्या मध्ये असून, रात्री बारापर्यंत त्यातून साडेसात मेट्रिक टन लिक्विड रुग्णालयात मिळणार आहे. शुक्रवारी सकाळी १६ मेट्रिक टन ऑक्सिजन लिक्विड येणार आहे.

- डॉ. अनिल माणिकराव, औषध निरीक्षक

व्हेपोरायझरचा बर्फ वितळला

टँक वापरात आल्यापासून प्रथमच व्हेपोरायझरचा बर्फ पूर्णत: वितळला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तो तातडीने काढला. एरव्ही तो काढायला मोठी कसरत करावी लागत होती. यात अनेक कर्मचाऱ्यांच्या हाताला मोठ्या गंभीर इजाही झाल्या आहेत.

Web Title: Oxygen cylinder backup saves 247 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.