धरणगाव, जि.जळगाव : बसला ट्रकने ओव्हरटेक करून एकदम पुढे आल्याने बसचालकाने प्रसंगावधान साधत श्रीजी जिनिंंगकडे गाडी घुसवल्याने अपघात झाला. जिनिंंगच्या बाहेर असलेल्या ११ हजार व्होल्टेजच्या डीपीजवळ हा अपघात घडला. मात्र सुदैवाने या बसमध्ये असलेल्य प्रवाशांना वा शाळेतील विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. बुधवारी दुपारी बाराला श्रीजी जिनिंग व आॅईल मिलजवळ ही घटना घडली.अमळनेर आगाराची जळगाव-अमळनेर बस (एमएच-१४-१३३०) ही बुधवारी दुपारी १२ वाजता धरणगावकडे येत होती. तेव्हा ट्रक (एमएच-१९-सीवाय-११८१) त्या बसला ओव्हरटेक करून बसच्या पुढे आला. तेव्हा बसचा मोठा अपघात टाळण्यासाठी ही बस जिनिग फॅक्टरीकडे वळवली. तेथे ११ हजार व्होल्टेजची विद्युत डीपी होती. त्या डीपीला जोरदार धडक लागली असती तर अनर्थ घडला असता. मात्र बसचालकाने प्रसंगावधान साधत बसला नियंत्रित केले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीव वाचविला. या घटनेमुळे सर्व प्रवाशांचे हृदयाचे ठोके वाढले होते.धरणगावचे सपोनि पवन देसले, हवालदार गंभीर शिंदे आदी घटनास्थळी पोहोचले. तातडीने पंननामा करून ट्रकला ताब्यात घेतले. मात्र ट्रकचालक फरार झाला. अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी प्रवाशांचा जीव वाचविणारे बसचालक विजय पाटील व वाहक भारत भोई यांनी प्रवाशांचे आभार मानले.
धरणगाव येथे ट्रकने ओव्हरटेक केल्याने बसचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 18:02 IST
बसला ट्रकने ओव्हरटेक करून एकदम पुढे आल्याने बसचालकाने प्रसंगावधान साधत श्रीजी जिनिंंगकडे गाडी घुसवल्याने अपघात झाला.
धरणगाव येथे ट्रकने ओव्हरटेक केल्याने बसचा अपघात
ठळक मुद्देसुदैवाने विद्यार्थ्यांसह प्रवासी बचावलेट्रकचालक फरार