शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:28 IST

आरटीओचा ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा : निष्पापांच्या जीवाला जबाबदार कोण? सुनील पाटील जळगाव : दोन दिवसांपूर्वी किनगावनजीक पपईचा ट्रक पलटी होऊन ...

आरटीओचा ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा : निष्पापांच्या जीवाला जबाबदार कोण?

सुनील पाटील

जळगाव : दोन दिवसांपूर्वी किनगावनजीक पपईचा ट्रक पलटी होऊन त्यात १५ जणांचा बळी गेला. या अपघाताने समाजमन सुन्न झाले आहे. जिल्ह्यातून होत असलेली ओव्हरलोड व अवैध प्रवासी वाहतूक यामुळेच हे जीव गेल्याचे बोलले जात असून हे दोन्ही मुद्दे यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे या अपघाताला नेमके जबाबदार कोण, हादेखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आरटीओच्या यंत्रणेचा याकडे अर्थपूर्ण कानाडोळा होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ट्रक, कंटेनर व इतर अवजड वाहनांमधून जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्यमार्गावरून ओव्हरलोड वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे, नागपूरसह गुजरात व मध्य प्रदेशात जिल्ह्यातून मोठ्या ट्रॅव्हल्सबसमधून प्रवासी वाहतूक केली जाते. या वाहनांची तपासणी केली तर त्यात अनेक प्रकारची त्रुटी दिसून येतील, मात्र ही एक साखळी असल्याने या बसेसकडे आरटीओ कधी ढुंकून पाहत नाही. याउलट हातावर पोट असलेल्या लोकांच्या जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून शासनदरबारी कारवाई व दंडाचा आकडा फुगवून दाखविला जातो. त्याशिवाय तालुका पातळीवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या परमिटधारक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महिन्याचे कारवाईचे टार्गेट पूर्ण झाले की स्वत:च्या टार्गेटकडे मोर्चा वळविला जात असल्याची ओरड होऊ लागली आहे.

कार्ड दाखवताच, ओव्हरलोड वाहन ठरते वैध

जिल्ह्यातून ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र अशा वाहनांवर कारवाई करताना कार्ड पद्धत आरटीओने सुरू केलेली आहे. अर्थात ही पद्धत वर्षानुवर्षे सुरूच असून यासाठी स्वतंत्र खासगी पंटर नेमलेले आहेत. आरटीओच्या भरारी पथकाने ओव्हरलोड वाहन अडविले की संबंधित चालकाकडून ‘कार्ड’ दाखविले जाते. या कार्डावरून पंटर, वाहनाचा प्रकार व रक्कम याची ओळख पटते. पथकातील अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत कार्डधारकाचा वाहन क्रमांक आला की ते ओव्हरलोड वाहन वैध होते, क्रमांक नसला तर मग कारवाई केली जाते किंवा जागेवरच अर्थपूर्ण व्यवहार करून मामला मिटविला जातो.

शासनाचा महसूल अधिकाऱ्यांच्या खिशात

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून त्याची दंडाची रक्कम शासन दरबारी जमा होते. मात्र, आरटीओकडून कार्ड स्वरूपात दरमहा लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जातो. वर्षाला कोट्यवधी रुपयांचा हा महसूल शासनाऐवजी अधिकाऱ्यांच्या खिशात जात असून शासनाचे मोठे नुकसान होत आहे. भरारी पथक तसेच चेक नाक्यांवर ड्युटी लावण्यासाठी निरीक्षक लाखो रुपये मोजतात, तर बाहेर जिल्ह्यातून येथे बदली करून घेण्यासाठीदेखील मोठी बोली लागते. या साऱ्या अर्थकारणाच्या मोहापायी कारवायांकडे कानाडोळा होतो अन‌् अपघातांत निष्पाप लोकांची जीव जातो.

--