शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात यंदा धरणे जुलैमध्येच ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 16:26 IST

गतवर्षी १५३ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील भूजलपातळी न घटल्याने हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या मध्यमप्रकल्पांसह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी या लघुसिंचन प्रकल्पांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आॅगस्टच्या पूर्वार्धापर्यंंत यंदा पूर्ण क्षमतेने भूजल साठा साठला आहे.

ठळक मुद्देगत वर्षाच्या तुलनेत जून व जुलै महिन्यात १६ ते ११ टक्के आघाडीवर असलेला पाऊस आॅगस्टमध्ये समांतरलघुसिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत

किरण चौधरीरावेर : गत वर्षीच्या पर्जन्यमानापेक्षा यंदा जून महिन्यात १५ टक्के तर जुलै महिन्यात ९ टक्क्यांनी आघाडीवर असलेल्या पर्जन्यमानाने मात्र गत वर्षाच्या आॅगस्ट महिन्यातील आजपावेतोच्या पर्जन्यमानासोबतची ८६.४८ टक्के सरासरी गाठली आहे. गतवर्षी माहे जुलैपर्यंत पिछाडीवर असलेल्या पर्जन्यमानाने मात्र जोर वाढवत आॅगस्टमध्ये मुसंडी मारल्याने यंदाच्या जून महिन्यापासून आॅगस्ट महिन्यातील सातत्य राखणाऱ्या पावसाशी आजमितीस तोंडमिळवणी करीत ८६.४ समांतर टक्केवारी गाठली आहे. दरम्यान, गतवर्षी १५३ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील भूजलपातळी न घटल्याने हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या मध्यमप्रकल्पांसह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी या लघुसिंचन प्रकल्पांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आॅगस्टच्या पूर्वार्धापर्यंंत यंदा पूर्ण क्षमतेने भूजल साठा साठला आहे.सन २०१८ मधील अत्यल्प पर्जन्यमानामुळे व उन्हाळ्यातील उष्ण दाहकतेमुळे केळीचे आगार असलेल्या या एव्हरग्रीन असलेल्या रावेर तालुक्याला दुष्काळाचे भीषण चटके सोसावे लागला. शासनाने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे अपयशा पाठोपाठ तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांनी फैजपूर येथील निमोर्ही आखाड्याचे महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज व स्वामी नारायण परिवारातील संत महंतांचा आश्रय घेऊन लोकसहभागातून तालूक्यात जलक्रांती अभियान राबविले होते.सुकी, भोकर, नागोई, खळखळी, मात्राण, नागझिरी, पाताळगंगा आदी तालुक्यातील नदी नाल्याचे पात्रातील गाळमाती उपसून खोल करून व ठिकठिकाणी लोकसहभागातून मातीचे साठवण बंधारे घालून एक थेंब अमृताचा म्हणून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम राबविण्यात आली होती.दरम्यान, सन २०१९ मध्ये दुष्काळातून मुक्त करण्यासाठी मात्र पावसाचे दिलासादायक आगमन झाले. जूनअखेरीस तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान ६६. ४३ मि.मी. पाऊस झाल्याने ९.९४ टक्के पाऊस झाला होता. दरम्यान, जुलै महिन्यात पावसाने जोर कायम ठेवल्याने सरासरी २९०.०१ मि.मी पाऊस झाल्याने ४३.४० टक्के पाऊस झाला होता. पावसाने आपला २०१८ मधील अनुशेष भरून काढण्यासाठी जणूकाही आपला जोर कायम ठेवल्याने २८ आॅगस्टपावेतो सरासरी ५७७.२९ मि.मी. पाऊस झाल्याने ८६.४० टक्के पाऊस झाला होता. या जुलै महिन्यापासून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात पर्जन्यमान स्थिर राहिल्याने १५ आॅगस्टपर्यंत हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ ही मध्यम सिंचन प्रकल्पातील तर गंगापुरी, मात्राण व चिंचाटी ही लघुसिंचन प्रकल्पाची धरणे भरून ओसंडून वाहली होती.त्या तुलनेत यंदा जून महिन्यात गतवषीर्पेक्षा दमदार पावसाची नोंद झाली. जून महिन्यात सरासरी १६८.८६ मि.मी. पाऊस झाल्याने २५.६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवषीर्पेक्षा १०२.४३ मि.मी. अर्थात १५ टक्के जास्त पर्जन्यमान झाले. तद्नंतर जुलै महिन्यात २९०.०१ मि मी सरासरी पाऊस झाल्याने एकूण ५७७.२९ मि मी पाऊस झाला असून ५२.२९ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत जुलै महिन्याखेर यंदा ५९.४२ मि.मी सरासरी पाऊस ९ टक्केंनी जास्त दिसत असला तरी केवळ जुलै महिन्यात यंदा ८०.८९ टक्के पाऊस मात्र कमी झाल्याचे वास्तव आहे. तद्वतच, या आॅगस्ट महिन्यात दि २८ पर्यंत ५७७.८६ मि मी पाऊस झाला असून केवळ या महिन्यात २२८.४३ मि मी पावसाची नोंद झाली आहे. या तुलनेत गतवर्षी केवळ आॅगस्ट महिन्यातील आजच्या तारखेपर्यंत २८७.२८ मि मी पाऊस झाल्याने यावर्षी गतवषीर्पेक्षा ५८.८५ मि मी अर्थातच ७९.५१ टक्के पाऊस कमी झाला असल्याने गतवर्षी उशिराने धडकलेल्या पावसाने जुलै व आॅगस्ट महिन्यात मुसंडी मारल्याने यावर्षी जूनपासून स्थिरावलेल्या पावसाशी ८६.४८ टक्के वर तोंडमिळवणी केली आहे.परिणामी यंदा जुलैच्या पूर्वार्धापासून आॅगस्टच्या पूर्वार्धात हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या मध्यम सिंचन प्रकल्पासह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी लघुसिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. 

टॅग्स :DamधरणRaverरावेर