सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १६ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील ३ हजार ८८२ जागांसाठी केवळ तीन हजारावर अर्ज प्राप्त झाले आहे. उर्वरित जागांवर इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य पराग पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील पॉलिटेक्निकची १६ महाविद्यालय आहे. त्यामध्ये १ शासकीय तर १५ खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला ३० जूनपासून सुरूवात झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ई-स्क्रुटिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुसरीकडे अर्ज करण्याच्या मुदतीअंती सुमारे ३ हजार ८८२ जागांसाठी तीन हजाराच्यावर अर्ज जळगाव जिल्ह्यातून प्राप्त झालेले आहे. १३ सप्टेंबरपासून पहिल्या कॅप राऊंडला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना १३ ते १६ तारखेपर्यंत ऑनलाइन पर्याय नोंदणीची मुदत देण्यात आली होती.
मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, संगणकाकडे विद्यार्थ्यांचा ओढा
पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि संगणक अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याची माहिती प्राध्यापकांकडून देण्यात आली. उर्वरित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल कमी असतो.
प्राचार्य म्हणतात...
यंदा डिप्लोमा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जे विद्यार्थी प्रथम वर्षाला प्रवेश घेत आहे, त्यांचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना पाठविल्या जात आहेत. जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांतील जागांसाठी सुमारे तीन हजारावर अर्ज प्राप्त झालेले आहे.
- पराग पाटील, प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय
००००००००
तर दुरूस्ती करता येणाऱ़़
विद्यार्थ्यांना १९ ते २२ सप्टेंबर या कालावधतील आपल्या अकाउंटमधून सेल्फ एआरसी प्रक्रिया करावयाची आहे. अर्थात विद्यार्थ्यांना स्वत: कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करावयाची आहे़ त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करून काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरूस्त करता येतील. त्याशिवाय १९ ते २३ सप्टेंबर याच कालावधीत विद्यार्थ्यांनी पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दुस-या कॅप राऊंडला सुरूवात होईल.
००००००००
एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालय : १६
एकूण प्रवेश क्षमता : ३८८२
प्रवेश अर्ज : सुमारे ३ हजारांवर
००००००००००
पॉलिटेक्निक महाविद्यालय
शासकीय : ०१
खासगी : १५
००००००००००
महाविद्यालय प्रवेश क्षमता
शासकीय : ५७०
खासगी : ३३१२
००००००००००