शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लोकसहभागातून अवयवदान आणि देहदान चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:41 IST

अखेरच्या श्वासापर्यंत समाजप्रबोधन करून अवयवदान आणि देहदान ही चळवळ राबवणार असल्याचा संकल्प तरुण डॉ.राहुल रामदास पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देचोपडा येथील डॉ.राहुल पाटील यांचा संकल्पविविध उपक्रमातून करताहेत समाज प्रबोधन

संजय सोनवणे ।चोपडा, जि.जळगाव : भारत देश हा तरुण युवकांचा देश आहे. युवकांच्या माध्यमातून देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. लोकांमधील ऊर्जा, सर्जनशीलता आणि दृढविश्वास या बळावर देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर असताना त्यासाठी सक्रिय समाज सहभाग पूरक ठरणार आहे. म्हणूनच अखेरच्या श्वासापर्यंत समाजप्रबोधन करून अवयवदान आणि देहदान ही चळवळ राबवणार असल्याचा संकल्प तरुण डॉ.राहुल रामदास पाटील यांनी व्यक्त केला.गीतेत कृष्णाने सांगितले आहे की, प्रत्येक माणूस त्याच्या जिवंतपणी जी कृत्ये करतो त्यानुसार त्याला पुढील गती प्राप्त होते. रक्तदान, नेत्रदान, अवयवदान ही विसाव्या शतकातील पुण्यकारक दाने होत. या दानांमुळे कोणाला दृष्टी मिळते तर कोणा अत्यावस्थास जीवनदान मिळते. अशा प्रकारचे दान करण्याची सोय आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे झाली आहे. तसेच देहाच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उपयोगी ठरते देहदान! म्हणून ही चळवळ राबविण्याची प्रेरणा मिळाल्याचे डॉ.पाटील सांगतात.शिक्षण, प्रशासन, न्यायासन, अध्यासन या क्षेत्रात युवाशक्ती फार मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झालेली आहे. चोपडा तालुक्यात यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ.राहुल पाटील यांनी दंत वैद्यकीय सेवा देत असताना अर्धांगिनी डॉ.तृप्ती पाटील यांच्या सहकार्याने गेल्या दोन दशकांपासून युवकांना विधायक कार्यात सहभागी करून घेतले. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी गेल्या पाच वर्षांपासून यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी १ जानेवारीला वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाज प्रबोधनातून शेकडो रक्ताच्या बाटल्या व देहदान करणारे आणि अवयव दान करणाऱ्या लोकांची संख्या वाढवण्यात त्यांना यश आले आहे. यासोबतच चोपडा तालुक्याचे धार्मिक प्रबोधन व्हावे यासाठी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेवशास्त्री सानप यांची प्रवचने यांचा कार्यक्रम ते समाज प्रबोधनासाठी आयोजित असतात. युवाशक्तीला नवा आयाम देताना वंदे मातरम या संघटनेमार्फत हेल्थ इस वेल्थ परिवार, ज्ञानेश्वरी परिवार यांच्या एकजुटीतून समाजसेवेचे अनेक मापदंड अर्चित केले आहेत. युवकांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रेरणा देत असताना डॉ.पाटील पती-पत्नी यांनी समाजसेवेचा एक आगळा वेगळा आदर्श शहरात प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचे समाज प्रबोधन करून त्यांना देहदान व अवयवदान करण्याचे महत्त्व पटवून या चळवळीत सहभागी करून घेतले आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे समाज चळवळ सुरू ठेवणार असल्याचा त्यांचा मानस आहे.डॉ.राहुल पाटील यांना या समाजप्रबोधनाची व देश सक्षम करण्याची प्रेरणा पुणे येथील थोर अविनाश धर्माधिकारी, सिंधुताई सपकाळ, न्यायाचार्य डॉ.नामदेवशास्त्री सानप यांच्या प्रेरणेतून मिळालेली आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा