शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आयुध निर्माणी कटिबद्ध -राजीव पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी कटिबद्ध असल्याचे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देभुसावळ आयुध निर्माणीत पंधरवड्यात विविध कार्यक्रमवसाहतीत स्वच्छता रहावी म्हणून घंटागाडी तैनात राहणारआयुध निर्माणी कचरा डबा मुक्त करण्यात येणार

भुसावळ, जि.जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी कटिबद्ध असल्याचे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांनी सांगितले.ते आयुध निर्माणीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अपर महाव्यवस्थापक सुधीर मलिक, संयुक्त महाव्यवस्थापक निलांद्री बिस्वास, कार्य व्यवस्थापक ए.के.देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक दीनबंधू मीणा, कनिष्ठ कार्य व्यवस्थापक ए.के.सोनी, अनुवादक विवेक स्वामी, पर्यवेक्षक विक्रमसिंह, युनियन प्रतिनिधी सतीश शिंदे उपस्थित होते.महाव्यवस्थापक राजीव पुरी पुढे म्हणाले की, भुसावळ आयुध निर्माणीत आपले लक्ष्य पूर्ण करून १ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आला होता. यात आयुध निर्माणीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कपाटांमधील सर्व कागदपत्रे नीटनेटके ठेवणे, प्रशासकीय कार्यालय व कॉलन्यांमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, स्वच्छतेवर आधारीत चित्रकला व निबंध स्पर्धा, मिनी मॅरेथॉन, कीटकनाशकांची फवारणी, सार्वजनिक शौचालय व गटारींची सफाई, जनजागृती रॅली आदी करण्यात आले.वसाहतीत स्वच्छता रहावी म्हणून घंटागाडी तैनात राहणार असून, आयुध निर्माणी कचरा डबा मुक्त करण्यात येणार आहे. विविध चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्यात आली. कचऱ्यातून खतनिर्मितीचा प्रयत्न राहणार असून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही पुरी यांनी केले.