शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वच जिल्हा बँकांच्या 'एमडीं'ची पात्रता व क्षमता तपासण्याचे आदेश

By सुनील पाटील | Updated: April 6, 2023 14:04 IST

बँकाच्या कार्यकारी संचालकांकडून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी केली जात आहे.

जळगाव : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्य सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकांची (मुख्य कार्यकारी अधिकारी) शैक्षणिक, अनुभव अर्हता तपासण्याचे आदेश राज्याचे सहकार आयुक्त यांनी दिले असून त्यासाठी प्रत्येक विभागात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. बँकाच्या कार्यकारी संचालकांकडून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी केली जात आहे.

राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबत आदेश जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील व्यक्ती रिझर्व्ह बँक तसेच नाबार्डच्या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे पात्र व योग्य असणे आवश्यक आहे. बँकांच्या स्तरावर सूचनांप्रमाणे कार्यवाही होत नाही. या बँका वित्तीय संस्था असून बँकेमधील वित्तीय व व्यावसायिक व्यवस्थापन पाहण्यासाठी रिझर्व्ह बँक, नाबार्डने बिहोत केलेली शैक्षणिक व अनुभव अर्हता धारण करणारी व्यक्तीच कार्यरत असणे आवश्यक आहे. 

या बाबीची पडताळणीसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) (लेखापरिक्षण) व संबंधीत जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था.(लेखापरिक्षण), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सह.संस्था, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड आदींचा समावेश आहे.

एप्रिलअखेर तपासणीसहकार आयुक्तांनी याबाबतचे आदेश डिसेंबरमध्ये काढले होते, मात्र मार्च एण्डींगमुळे ही तपासणी मोहीम लांबणीवर पडली होती. आता एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात तपासणी होऊन विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अहवाल सादर होऊन नंतर ते आयुक्तांकडे अहवाल सादर करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव