जामनेर, जि.जळगाव : गोंडखेल, ता.जामनेर येथील सहकारी साखर कारखान्यातील मशिनरी, जागा आदी कोणतीही मालमत्ता ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय विक्री करु नये, असा ठराव शनिवारी ग्राम पंचायतीत झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.गोंडखेल साखर कारखान्याची वार्षिक सभा २३ सप्टेंबरला जामनेर येथील सुपारी बागेत होणार आहे. सभेत कारखान्याची मशिनरी, मशिनरी स्पेअर पार्टस, मुख्य ईमारत शेडस व इतर शेडस विक्रीबाबत फेरविचार करणे असा विषय घेण्यात आला आहे.पंचायतीने घेतलेल्या ठरावात म्हटले आहे की, गावात उद्योग, व्यवसायाची उभारणी होऊन स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी पंचायतीने कारखान्यासाठी जागा दिली.सरपंच चित्रा राजू परदेशी, उपसरपंच आत्माराम ठाकरे, ग्रामसेवक संजय चौधरी यांच्यासह सुमारे ३०० ग्रामस्थ सभेला उपस्थित होते. ठरावाची प्रत साखर आयुक्त, पुणे, सहकार राज्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, साखर कारखान्याचे चेअरमन यांच्यासह अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
जामनेर साखर कारखाना मालमत्ता विक्रीस विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:20 IST
गोंडखेल येथील ग्रामसभेत झाला निर्णय
जामनेर साखर कारखाना मालमत्ता विक्रीस विरोध
ठळक मुद्देग्रामपंचायत व ग्रामसभेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही मालमत्तेची विक्री करु नये.गोपाल राजपूत हे या ठरावाचे सूचक असून, सीताराम मगर अनुमोदक आहेत.