शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:00 IST

हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.

Shiv Sena UBT: "महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेउद्धव ठाकरे हे एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे. त्यामुळे राज ठाकरेउद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नयेत यासाठी विरोधकांकडून विघ्न निर्माण केले जात आहे," असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केला आहे.

सुभाष देसाई हे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी उद्धवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्ह्यात पक्षाची स्थिती आणि इतर मुद्यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली.

संघर्ष मोठा आहे, लढा आणि जिंकण्याचा संदेशशिवसेनेत फुटीनंतर काही नेते शिंदेसेनेत गेले आहेत. मात्र, आपल्याकडे शिवसैनिकांची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव विसरून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे देसाई यांनी सांगितले. आगामी काळात पक्षासाठी संघर्ष मोठा आहे. मात्र, या संघर्षावर मात करून पक्ष संघटनेच्या जोरावर पुन्हा पक्षाला चांगले दिवस आणायचे आवाहन देसाई यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या बैठकीत संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, लक्ष्मण पाटील, महानंदा पाटील, विराज कावडिया यांच्यासह उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत देसाई यांनी आढावा घेतला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना