शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व पुढारी चोर आहेत’ म्हणत पारोळा शेतकी मतदार संघाच्या निवडणुकीत मतदाराने काढला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:09 IST

आॅनलाईन लोकमत जळगाव,दि.२७ : पारोळा शेतकी मतदार संघाची निवडणूक होऊन सोमवारी त्याचा निकाल घोषित झाला. यावेळी एका मतदाराने मतपत्रिकेवर ...

ठळक मुद्देमतदाराने मतपत्रिकेवर लिहिले, ‘सर्व पुढारी चोर आहेत’शिवसेनेचा सर्व १५ जागांवर विजयभाजपा व राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारूण पराभव

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२७ : पारोळा शेतकी मतदार संघाची निवडणूक होऊन सोमवारी त्याचा निकाल घोषित झाला. यावेळी एका मतदाराने मतपत्रिकेवर ‘सर्व पुढारी चोर आहेत’ म्हणत आपला संताप व्यक्त केला.पारोळा शेतकी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे शेतकरी पॅनल व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ए.टी.पाटील यांच्या जनाधार पॅनलमध्ये लढत झाली.मतदाराने मतपत्रिकेवर लिहिले, ‘सर्व पुढारी चोर आहेत’मतदानावेळी एका मतदाराने ‘सर्व पुढारी चोर आहेत’ असे लिहित मतपत्रिका पेटीत टाकली होती. तर काही मतदारांनी मतपत्रिकेवर हाताचा अंगठा टेकून मत दिले होते. मतमोजणीच्या वेळी ते मतदान बाद केले.शिवसेनेचा सर्व १५ जागांवर विजययावेळी शिवसेनेच्या १५ च्या १५ जागांवर विजय घोषित होताच शिवसेनेच्या कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. विजयी मिरवणूक चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतून काढण्यात आली. डोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला. विजयी उमेदवारांचे माजी आमदार चिमणराव पाटील, जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने, कृ.उ.बा.समिती सभापती अमोल पाटील, न.पा.गटनेते मंगेश तांबे, जिजाबराव पाटील, जितेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी म्हणून ए.ए. गावळे यांनी काम पाहिले.भाजपा व राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारूण पराभवसकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती संस्था मतदार संघाची मतमोजणी प्रथम झाली. यात १०१ पैकी ७ मते बाद झाली होती. सर्वात जास्त मते (६२) अरुण दामू पाटील यांना मिळाली. भाजपाचे खासदार ए.टी.पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, नगराध्यक्ष करण पवार यांच्या जनाधार पॅनलला माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या शेतकरी पॅनेलने धूळ चारीत २५ वर्षापासूनची सत्ता कायम ठेवली. शिवसेनेने सहकार क्षेत्रात आपली असलेली पकड मजबूत केली. बाद मतदानाचे प्रमाण संस्था मतदार संघात (७) जनरल मतदार संघात (१०९१) एवढे मते बाद झाली.

टॅग्स :ElectionनिवडणूकParolaपारोळा