शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अफूची लागवड अंमलीपदार्थ की खसखससाठी?, हजार गोण्यांची किंमत १० कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:58 IST

Jalgoan : अफूच्या शेतीवर निर्बंध असल्याने प्रकाश सुधाकर पाटील (वय ४०,रा.वाळकी, ता.चोपडा) या शेतकऱ्याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी लागवड केली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

जळगाव : चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारात पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अफूची शेती उद्ध्वस्त केली. जिल्ह्यात प्रथमच अफूची लागवड झाल्याचे या घटनेतून समोर आले. अफूचा वापर हा हेरॉईन या अंमली पदार्थ व खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. अफूच्या शेतीवर निर्बंध असल्याने प्रकाश सुधाकर पाटील (वय ४०,रा.वाळकी, ता.चोपडा) या शेतकऱ्याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी लागवड केली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

मजूर व पोलीस मिळून हे पीक काढण्यात आले असून त्याला तीन दिवस लागले. त्यातून हजारापेक्षा जास्त गोण्या भरण्यात आल्या आहेत. रविवारी सायंकाळी ही मोहीम पूर्ण झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी ‘लोकमत’ ला दिली. खसखस तयार करण्यासाठी आपण अफूची लागवड केली होती असे प्रकाश याने पोलिसांना सांगितले असले तरी रात्रीच्यावेळी शेती बघायला अलिशान कार येत होत्या, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.

काय आहे नेमकं अफू?१) अफू हे तीन महिन्यांचे पीक आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये ही लागवड केली जाते. कांद्याच्या बियाण्यात मिसळून अफूचे बी जमिनीवर फेकले जाते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या पिकाला फुले येतात. फुले गळून पडल्यानंतर त्यापासून बोंड तयार होते. या हिरव्या दिसणाऱ्या बोंडाला चिरा मारून त्यातून द्रव्य पदार्थ एकत्र केला जातो. याच द्रव्य पदार्थापासून अफू आणि चरस तयार केला जातो. त्यामुळे या अफूचा वापर बोंडापासून हेरॉइन, चरस आणि गांजा बनवण्यासाठीच केला जातो.

२) अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो. अफू ही पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. अफू हे ६० ते १२० सेंमी. उंची असणारं झुडूप आहे. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. बिया लहान, पांढऱ्या व विपूल असून त्यांनाच खसखस म्हणतात.

३) जगात अफूचे सर्वाधिक उत्पादन अफगाणिस्तानामध्ये होते. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात.

आतापर्यंतच्या चौकशीत संबंधित शेतकऱ्याने तीन महिने किरकोळ स्वरुपात बी गोळा केले व डिसेंबरमध्ये त्याची लागवड केली. अफूचा वापर अंमली पदार्थ व खसखस या दोघांसाठी होतो. त्याने प्रथमच ही लागवड केली आहे. काही बाबी तपासाचा भाग आहे. या प्रकरणात सर्व कंगोरे तपासले जात आहेत.- प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव