संतोष सूर्यवंशीनंदुरबार : राजकारणात सर्वच राजकीय पक्षांकडून केवळ विविध घोषणांचाच पाऊस पाडण्यात येत असतो़ प्रत्यक्ष निवडून आल्यावर मात्र कृतीशून्य असते़ त्यामुळे घोषणांवर फारसा विश्वास न ठेवता कृतीला अधिक महत्त्व द्यावे, असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात आले़‘लोकमत’ प्रतिनिधीने नंदुरबार ते साक्री लोकसभा मार्गावर एसटी बसने प्रवास करून प्रवाशांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक मतदारांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, गरिबांना दरवर्षी ७२ हजार आदी ज्वलंत मुद्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या़ बसमध्ये अनेक शेतकरीही प्रवास करीत होते़ त्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन बाहेरुन आयात केलेल्या वस्तूंना मात्र अधिक किंमत मोजून आणले जात आहे़ शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव दिल्यास त्याची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले़ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा असल्याने नवीन येणाºया सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले़ लोकप्रतिनिधींही स्थानिक शेतकºयांचे प्रश्न संसदेत मांडत त्याचा पाठपुरावा करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आली़ ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न वेगवेगळे आहे़ त्यामुळे दोघांना न्याय कसा मिळता येईल याचा विचार करून सरकारने काम करावे, असेमत काही प्रवाशांकडून व्यक्त झाले़ युवकांनी रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली़पायाभुत सुविधा द्याव्यानिवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतात़ परंतु यात पायाभूत सुविधांचा अभाव असतो़ राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात, रस्ते, वीज, घरे, पाणी आदी पायाभूत सुविधांचाही समावेश करावा अशी अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात आली़शासनाने युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन पर योजना सुरू करण्याचीही अपेक्षा काही तरुणांंनी व्यक्त केली़
राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:00 IST