शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणेतील त्रूटी दूर करण्याचेच आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:23 IST

कोरोना योध्दांच्या नव्या चमूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा, नव्या अधिष्ठातांच्या भूमिकेमुळे वैद्यकीय अधिकारी आले कामावर, लोकप्रतिनिधींनीदेखील चार पावले पुढे येऊन प्रशासनाला द्यावे सहकार्य

मिलिंद कुलकर्णीजून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पदार्पण करताना खान्देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जळगावात २२००, धुळ्यात ५०० व नंदुरबारात ८० च्या घरात रुग्णसंख्या पोहोचली आहे. मृत्यूदरदेखील चिंतेचा विषय आहे. त्यादृष्टीने आता कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्रीय समितीने जळगावात भेट देऊन पाहणी केली, अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनीही जळगावसह ४५ पालिकांच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेतला होता. त्यांच्या व अलिकडे आलेल्या पथकाच्या सुचनांमध्ये साम्य आहे. त्याकडे झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम संपूर्ण खान्देशाला भोगावे लागत आहे. कोरोनाचा संपूर्ण जगात उद्रेक झाल्याने आणि त्यावर प्रतिबंधात्मक औषध अद्यापही उपलब्ध नसल्याने दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते. ज्येष्ठ नागरिक आणि पूर्वीपासून ठराविक आजार असलेल्या लोकांना धोका असल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता होती. परंतु, महानगरांपासून छोट्या गावांपर्यंत वैद्यकीय व्यावसायिकांनीही भीतीपोटी, सुरक्षा उपाय नसल्याने वैद्यकीय सेवा सीमित किंवा बंद केली. सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा जगजाहीर असल्याने तिकडे वळणाºया लोकांना अभाव आणि कमतरतांचा मुकाबला करावा लागतो. खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे योग्य व्यवस्थापन व नियोजन जिल्हा प्रशासन व वैद्यकीय-आरोग्य प्रशासनाने केले असते, तर हा उद्रेक रोखता आला असता. नेमक्या याच त्रुटीवर केंद्रीय पथकाने बोट ठेवले आहे. कोरोनाची भीती आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयांची एकूण अवस्था यामुळे रोगाची लक्षणे दिसत असूनही रुग्ण उपचाराला विलंब करीत असल्याचे दिसून आले आहे. रुग्णवाहिकांअभावी काहींना वेळेवर उपचार मिळू शकले नसल्याची तक्रार अधूनमधून येत आहे. राजकीय, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिका नेमक्या गेल्या कुठे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. झोपडपट्टी व दाट वस्तीत गांभीर्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे. सर्वेक्षणाचे गांभीर्य हरवले आहे. उपचार म्हणून सर्वेक्षण केले जाते. त्याला आरोग्य सेवक आणि नागरिकदेखील जबाबदार आहेत. दोघांनाही कोरोनाची भीती वाटत असल्याने एकमेकांना टाळले जात आहे. वैद्यकीय व महसूल यंत्रणेचे प्रमुख आता नवे आहेत, जुन्या झालेल्या चुका दुरुस्त करुन पुढे जाण्यासाठी त्यांना आता प्रयत्न करावे लागतील. केंद्रीय व राज्य सरकारच्यादृष्टीने जळगावची बिकट स्थिती चिंतेचा विषय आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वत: येऊन गेले. राज्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी याठिकाणी पाठविले आहे. परिचारिकांचा चमू दिला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना आता करायला हव्यात.जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूदर अद्यापही चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिष्ठाता, जिल्हाधिकारी यांच्यासह नवीन चमू युध्दाला सज्ज झाला आहे.अभिजित राऊत, डॉ.रामानंद यांनी अशा परिस्थितीत कार्यभार हाती घेतला आहे, की त्यांना कठोर पावले उचलल्याशिवाय गत्यंतर नाही. दोघेही अनुभवी अधिकारी आहेत. दोघांची दिशा निश्चित आहे. मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी प्रयत्न सुरु केले आहे , तर आरोग्य यंत्रणा तंदुरुस्त करण्यासाठी अधिष्ठात्यांनी कार्यवाही सुरु केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव