लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ३१ जुलैअखेर एकूण सरासरीच्या फक्त ६०.४ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. जुलैअखेर पावसाची एकूण सरासरी १८९.२ मिमी एवढी आहे. मात्र, आतापर्यंत ११४.३ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. यंदा भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ६८.८ मिमी एवढा पाऊस झाला आहे. हा जुलैपर्यंतच्या सरासरीच्या फक्त ३५ टक्के एवढाच पाऊस आहे.
यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यात चार दिवस, तर संपूर्ण जिल्ह्यात कुठेच पावसाचा थेंबही पडला नाही. तसेच जेव्हाही पाऊस झाला, तेव्हा तुरळक पाऊस होत होता. मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पावसाची सरासरी अजूनही खूप कमी आहे. आतापर्यंत फक्त चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात १४५.९ मिमी तर एरंडोल तालुक्यात १७०.८ मिमी पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)
जळगाव - ११०.६
भुसावळ -६८.८
यावल - ८४.८
रावेर - ११५.४
मुक्ताईनगर -११.२
अमळनेर - ९०.८
चोपडा - ९५.९
एरंडोल - १७०.८
पारोळा - १४०.२
चाळीसगाव - १४५.९
जामनेर - ११७.२
पाचोरा - ११७.६
भडगाव - ११७.३
धरणगाव - १३५.३
बोदवड - ९७.५