शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव वनक्षेत्रातील नऊ हजार हेक्टरासाठी अवघे २० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:18 IST

गेल्या चार महिन्यात नरभक्षक बिबट्याने चार मानवी बळी तर अनेक जनावरांचा फडशा पाडला.

ठळक मुद्देनऊ हजार हेक्टर वनक्षेत्राचे एकूण सात बिटअनेक वर्षात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना नाही.दोन महिन्यांपूर्वी पिंपरखेड शिवारातून एक बिबट्या जेरबंद

जिजाबराव वाघ / आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : चाळीसगाव वनविभागात आॅगस्टमध्ये पहिल्यांदा बिबट्याने डरकाळी फोडून आपण आल्याची वर्दी दिली. यानंतर गेल्या चार महिन्यात नरभक्षक होत त्याने चार मानवी बळी तर अनेक जनावरांचा फडशा पाडला. बिबट्या एक आहे की, अधिक हे कोडे असले तरी तालुक्यातील नऊ हजार वनक्षेत्राचे पहारेकरी म्हणून अवघे २० कर्मचारी आहे. याबरोबरच वनगस्तीसाठी आवश्यक साधने यांचीही वानवा असल्याने पिंजरे लावूनदेखील नरभक्षक बिबट्याने सातत्याने वनविभागाला हुलकावणी देत आहे.रचना ब्रिटिशकालिनचाळीसगाव तालुक्यात प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण नऊ हजार वनक्षेत्र आहे. याची रचना ब्रिटिशकालीन आहे. गेल्या अनेक वर्षात त्यात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना झालेली नाही. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रासाठी अवघे २० कर्मचारी आहेत. एक चारचाकी वाहन, चार पिस्तूल आहेत. अद्ययावत साधनांचाही खडखडाट आहे. याच वनक्षेत्राला लागून वन्यजीव विभाग व गौताळा अभयारण्याच्या सीमारेषा जोडल्या गेल्या आहेत. साहजिकच हिस्र प्राणी प्रादेशिक वनविभागात सहज प्रवेश करतात. चाळीसगाव वन्यजीव विभागाने केलेल्या प्राणीगणनेत याभागात बिबटे असल्याची नोंद यापूर्वीच केलेली आहे.वनक्षेत्रात सात विभागनऊ हजार वनक्षेत्राचे एकूण सात विभाग केले असले तरी त्याच्या सीमा मोठ्या आहेत. यात सुसूत्रता आणण्यासाठी याचे किमान १५ बीट व्हावे, असे वनप्रेमी व वन्यजीव रक्षकांचे म्हणणे आहे. यामुळे कर्मचारी संख्याही वाढेल.उपखेड बिटमध्ये तालुक्यातील १०८ गावांपैकी ८० गावांलगतचे वनक्षेत्र येते. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रासाठी वनपालदेखील नाही. घोडेगाव बिटच्या वनपालांकडे याचा पदभार आहे.बिबट्याने उपखेड वनक्षेत्रातच मोठा उच्छांद मांडला आहे.जे चार मानवी बळी बिबट्याने घेतले तेही याच विभागातील गावांमधील आहे.सात बिट, २० कर्मचारीनऊ हजार हेक्टर वनक्षेत्राचे एकूण सात बिट करण्यात आले आहेत. यात जंगल सुरक्षेसाठी एक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, सात बिटगार्ड, दोन वनपाल, १० वनमजूर असे एकूण २१ कर्मचारी असून ही संख्या तोडकी आहे.

 नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी एकूण सात पिंजरे लावले आहेत. दोन शूटर्स, एक ड्रोन कॅमेरा, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा वनविभागातील ४० कर्मचारी वनगस्त घालीत आहोत. दोन महिन्यांपूर्वी पिंपरखेड शिवारात एका बिबट्याला आम्ही जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.- संजय मोरे, वनपरिक्षेत्र अधिकार, प्रादेशिक वनविभाग, चाळीसगाव

 वनक्षेत्रांची पुनर्रचना ही एक ज्वलंत समस्या आहे. लहान बिटात विभागणी केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. अपूर्ण मनुष्यबळ, नियमित प्रशिक्षणे याचाही अभाव आहे. वनगस्तीसाठी अद्ययावत साधानेही पुरवली जात नाही. जंगलात प्राण्यांसाठी अन्नसाखळी वाढविण्यासाठी प्रायोगिक कामदेखील झाले पाहिजे.- राजेश ठोंबरे, वन्यजीव रक्षक व सर्पमित्र, चाळीसगाव.

टॅग्स :forest departmentवनविभागChalisgaonचाळीसगाव