शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्याचे आॅनलाईन आव्हान-डॉ.जगदीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 14:43 IST

घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी आॅनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देद्वारकाई व्याख्यानमालेत गुंफले प्रथम पुष्पतीन दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमाला

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाने अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन कौशल्याचे तंत्रच बदलून टाकले आहे. अर्थात आॅनलाईन शिक्षणाचे माध्यम वापरणे गरजेचे बनल्याने शाळाच घरात आली आहे. पण या घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी आॅनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ.पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफले.प्रारंभी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मातोश्री स्व. द्वारकाबाई नेमाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समन्वयक अरूण मांडळकर यांनी व्याख्यानमालेचा आढावा घेऊन वक्त्यांचा परिचय करून दिला.उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश कथन केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सल्लागार गणेश फेगडे यांनी केले. त्यानंतर शाळा आली घरात या विषयावर डॉ.जगदीश पाटील यांनी कस्टम अ‍ॅनिमेशन पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून झूम अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या व्याख्यानाची मांडणी केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शाळा कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या तरी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय उभा करण्यात आला आहे. त्यामुळे घराघरातील पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे. अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करून कृती मालिकांची निर्मिती करावी लागेल तरच घरात आलेली शाळा समृद्ध होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. आॅनलाईन शिक्षण चार प्रकारे घेता येते. त्यात शंभर टक्के आॅनलाईन, अंशत: आॅनलाईन, व्हिडिओ व आॅडिओ या प्रकारांचा समावेश करता येईल. क्षमतांचा कस लावणारे हे शिक्षण आहे. पण मोठ्या भावाच्या अभ्यासाचे आकलन लहान भाऊही दृकश्राव्य माध्यमांद्वारे करू शकतो. याचा अर्थ ज्ञानाचे भांडार आॅनलाईन शिक्षणाने खुले केले आहे. पालकांनीही आॅनलाईन साक्षरतेवर भर द्यावा, असेही ते म्हणाले. संगणक, मोबाईल क्रांतीमुळे शिक्षण मुठीत आले आहे. एका क्लिकवर हवे ते मिळवता येते. मात्र असे असले तरी शिक्षण विभागाने पाल्यांना जी पाठ्यक्रमाची पुस्तके पोहोचवली आहेत, ती हाताळावी. मुलांशी संवाद, गप्पा, चर्चांच्या माध्यमातून प्रवाही संवाद साधावा. आॅनलाईन शिक्षणाने शाळा व शिक्षकांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. परंतु आपल्याला या आभासी जगाशीसुद्धा जुळवून घ्यावे लागेल, असेही मत त्यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा.नीलेश गुरूचल, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज पांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ