शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात एकास तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:58 IST

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात जावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोपाळ भिमराव कापसे (३४, रा.न्हावे, ता.चाळीसगाव) या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी तीन वर्ष सश्रम कारावास व साडे चार हजार रुपयाचा दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी हा निकाल दिला.

ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल   चार कलमांमध्ये धरले दोषी

जळगाव : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात जावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोपाळ भिमराव कापसे (३४, रा.न्हावे, ता.चाळीसगाव) या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी तीन वर्ष सश्रम कारावास व साडे चार हजार रुपयाचा दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी हा निकाल दिला.याबाबत अधिक माहिती अशी की, २२ मे २०१५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पीडित तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधून गोपाळ याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन पीडितेशी अश्लिल वर्तन केले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गोपाळ कापसे याच्याविरुध्द विनयभंग, बाललैंगिक अत्याचार व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी तथा उपअधीक्षक केशव पातोंड यांनी चौकशीअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. पीडित मुलगी, तिची आई व तपासाधिकाºयांची साक्ष ग्राह्य धरुन न्या.जे.पी.दरेकर यांनी गोपाळ याला दोषी धरले. सरकारतर्फे अ‍ॅड.शिला गोडंबे यांनी बाजू मांडली.असे कलम, अशी शिक्षाकलम ३५४ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम ४५२ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम ८ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत दोन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व पीडित मुलीस दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव