शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : एक हजारावर दुचाकी व ४०० चारचाकी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:59 IST

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

ठळक मुद्देमुहूर्त साधलामोबाईल बाजार जोरात

जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. दुचाकी व कारला मोठी मागणी राहिली तसेच एलईडीचीही चांगली विक्री झाली. ३००च्यावर मोबाईल विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत नवीन एक हजार दुचाकी तर ४०० चारचाकी रस्त्यावर आल्या.साडेतीन मुहुर्तांसह गणेश चतुर्थीलादेखील विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीसाठी या वस्तूंची अगोदरच नोंदणी (बुकिंग) करून ठेवतात. त्यानुसार यंदाही अनेकांनी नोंदणी (बुकिंग) करून ठेवली होती. बुधवारी व गुरुवारी अनेकांनी विविध वस्तूंची खरेदी करून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधला.एक हजार दुचाकींची विक्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी दुचाकी खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती दिसून आली. शहरातील एकाच दालनात ३००च्यावर दुचाकींची विक्री झाली. या दुचाकींसह इतरही दालनातील मिळून एकूण एक हजार दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. दुचाकींवर विविध योजना असल्याने त्याचाही लाभ ग्राहकांनी घेतला. यामध्ये मनपसंत वाहन मुहूर्तावर मिळण्यासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. या नोंदणी केलेल्या वाहनांसह ऐन वेळीदेखीलखरेदी मोठ्या प्रमाणात झाली. यासाठी गुरुवारी दालनांमध्ये मोठी गर्दी झाली होती.चारचाकी वाहनेदुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांच्या खरेदीतही उत्साह आहे. शहरातील एकाच दालनात १५० चारचाकींची बुकिंग झाले आहे. गुरुवारी येथून केवळ ५० वाहने ग्राहकांना दिली जाणार होती. मागणी वाढल्याने ही संख्या ८०वर पोहचली. एकूणच शहरातील विविध दालनांमधून ४०० चारचाकी वाहनांची विक्री होण्याचा अंदाज आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बुधवारीदेखील २० ते ३० चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. त्यामुळे या दोन्ही दिवस दालनामध्ये मोठी गर्दी झाली होती.मोबाईल बाजार जोरातयंदा मोबाईलला मोठी मागणी राहिली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नेहमीपेक्षा मागणी दुप्पट वाढल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत तब्बल ३०० मोबाईलची विक्री झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडीला जास्त मागणी होती. शहरात जवळपास १०० एलईडी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. त्या खालोखाल होम थिअटर, वाशिंग मशिन, फ्रिज यांना मागणी राहिली.यंदा चारचाकी वाहनांना मोठी मागणी वाढली आहे. गणेश चतुर्थीसाठी अनेकांनी अगोदरच नोंदणी केलेली होती. आज ८० वाहनांची विक्री झाली.- उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.दुचाकींना नेहमीप्रमाणे चांगली मागणी राहिली. गणेश चतुर्थीसाठी मोठी नोंदणी होती. रात्रीपर्यंत खरेदीसाठी गर्दी होती.- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.इलेक्ट्रॉनिक्स बाजारात एलईडी, होम थिएटरला मागणी राहिली. त्या खालोखाल वाशिंग मशिन, फ्रिज यांना चांगली मागणी होती. विविध योजना दिल्या जात असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होतो.-दिनेश पाटील, विक्रेते

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव