शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथे प्रवाशाला लुटणाऱ्या जळगावात अटक

By सागर दुबे | Updated: April 20, 2023 14:07 IST

कोकणगाव शिवारातील (नाशिक) रहिवासी पंडित राजाराम ढोणे यांना ९ एप्रिल रोजी सायंकाळी एका रिक्षा चालकाने तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षामध्ये बसविले.

जळगाव : तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षाचालकासह चौघांनी प्रवाशाला निर्जनस्थळी नेत मारहाण करून १० हजार रूपये लुटल्याची घटना नाशिक येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळ ९ एप्रिल रोजी सायंकाळी घडली होती. या गुन्ह्यातील एका संशयिताला जळगाव शहर पोलिसांनी गुरूवारी गेंदालाल मिल येथून अटक केली असून दिनेश सुनील सोनवणे (रा.सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

कोकणगाव शिवारातील (नाशिक) रहिवासी पंडित राजाराम ढोणे यांना ९ एप्रिल रोजी सायंकाळी एका रिक्षा चालकाने तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षामध्ये बसविले. त्यांच्या आजू-बाजूला रिक्षा चालकाचे साथीदार बसले. नंतर ढोणे यांना कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळील निर्जनस्थळी नेवून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील १० हजार रूपयांची रोकड चौघांनी हिसकावून धूम ठोकली होती.

याप्रकरणी १० एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तर पोलिसांनी रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (३४, रा.पवारवाडी, ता. मालेगाव) याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यात दिनेश सोनवणे (रा. सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल, जळगाव), शेख जावेद सलीम, शेख मुस्तफा (दोन्हीरा. सुरत) या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. ही माहिती नाशिक पोलिसांनी शहर पोलिसांना दिली होती. अखेर गुरूवारी दिनेश हा गेंदालाल मिल येथे आला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील तेजस मराठे व योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी लागलीच त्याला पकडून पोलिस ठाण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव