शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:02 IST

कुºहाडीने केले दोन घाव, आरोपीस अटक

अडावद, ता.चोपडा : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मरिमातेच्या मंदिराजवळ मंगल गायकवाड (भिल) याने गणेश भिल याचा कुºहाडीने घाव घालून खून केला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हसरत भिल (वय ३६) रा.वडगाव याच्या घरात घुसून मंगल धनसिंग गायकवाड (भिल) याने दशरथ भिल याच्या पत्नीचा हात धरून तिच्याशी अंगलट करण्यास सुरूवात केली. दशरथने त्यास पत्नीपासून दूर केले. याचा राग आल्याने त्याने दोन्ही हाताने दशरथ भिलचा गळा दाबला असता त्याच्या तावडीतून सुटून बाहेर पळाला. मंगल कुºहाड घेऊन त्याच्या मागे धावला. त्याला चुकवत दशरथ मरिमातेच्या ओट्याआड लपला. मरिमातेच्या ओट्यावर बसलेल्या रामदास भिल याने हा कुºहाड घेऊन कुणामागे धावतो, असे बोलला म्हणून मंगलने रामदासवर कुºहाड उगारली. मात्र तेथेच मासे पकडण्याचे जाळे विणत बसलेला त्याचा सासरा गणेश सुका भिल (वय ४५) हा मंगल भिल यास थांबविण्यास गेला असता त्याने गणेशच्या मानेवर व डोक्यावर कुºहाडीने दोन वार केले. ग्रामस्थांंनी मंगल भिल यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी गणेश भिल यास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. याबाबत दशरथ भिल याच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गजानन राठोड करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाChopdaचोपडा