शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

बालिकेवर अत्याचार एकास चार वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:57 IST

आव्हाणी येथील घटना

जळगाव :नऊ वर्षाच्या बालिकेसोबत अत्याचार केल्याप्रकरणात नरेंद्र मुरलीधर पाटील (३०, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) याला चार वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे कटारिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.याबाबत माहिती अशी की, ३० जुलै २०१६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडित बालिका घरात एकटी असताना नरेंद्र पाटील याने तिच्या घरात जावून अत्याचार केले. या प्रकरणी पिडीतेच्या आईने पाळधी दूरक्षेत्र अंतर्गत धरणगाव पोलीस स्टेशनला १ आॅगस्ट २०१६ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार ३५४ ब, ४५२ व लैगिंक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७ व ११ (१) अन्वये संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तपास सहायक पोेलीस निरीक्षक पी.के. सदगीर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सहा साक्षीदारांची तपासणीसरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित , पिडितेची आई, दीपक बाबुराव पाटील, डॉ. विकास प्रल्हाद पाटील, डॉ. शेख असिफ इकबाल व तपासी अंमलदार पी.के. सदगीर तर संशयितातर्फे बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने नरेंद्र पाटील याला दोषी धरून कलम ३५४ ब, ४५२ खाली प्रत्येकी एक वर्ष व प्रत्येकी ५०० रुपये दंड तर लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७ खाली ४ वर्ष सक्तमजूरीची व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी सहायक फौजदार शालीग्राम पाटील यांनी मदत केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव