अमळनेर : तालुक्यातील सडावन येथील भाऊराव रूपचंद भिल (वय ५०) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी घडली.पंकज नागराज पाटील यांचे सडावन येथे गट ७९ मध्ये शेत असून ते सकाळी शेतात गेले असता त्यांना एक पुरुषाचे प्रेत विहिरीत तरंगताना दिसले. त्यांनी पोलीस पाटील यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले असता ते भाऊराव भिल यांचे असल्याचे समजले.याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास भरत ईशी करीत आहेत.
सडावन येथे एकाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:33 IST