शासन निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील सरकारी, निमसरकारी, शासकीय आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नतीतील आरक्षण रोखले जाणार असल्याचे सांगत यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे किशोर नरवाडे, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, रेखा मेश्राम, वैशाली भालेराव, सुनीता लांडगे, सुनील देहडे, सुकलाल पेंढारकर, बहुजन क्रांती मोर्चाचे चंद्रकांत नन्नवरे, अमजद रंगलेले, इरफान शेख, असंघटित कामगार क्षेत्रातील खुशाल सोनवणे, योगेश नरवाडे, सतीश नरवाडे, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या दीपाली पेंढारकर, रियाज शेख, इद्रीस शेख, मंगेश साळवे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे सलीम तडवी, ग्रामसेवक संघटनेचे राजेंद्र भालशंकर, मराठा सेवा संघाचे प्रवीण बिऱ्हाडे, कॉस्ट्राईब संघटनेचे सचिव वसंत सपकाळे, आदी सहभागी झाले होते.