रावेर : येथील माऊली फाउंडेशनद्वारा संचलित प्रसूतिगृहात प्रसूत होणाऱ्या महिलांना आपल्या पाल्याच्या वाढदिवसाच्या अविस्मरणीय स्मृती जोपासण्यासाठी व बाळाच्या संगोपनासोबतच वृक्षसंवर्धन करण्यासाठी ‘एक बाळ, एक झाड’ ही राबवलेली मोहीम खऱ्या अर्थाने लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी येथे केले. माउली फाउंडेशनतर्फे महिलांना ‘एक बाळ, एक झाड’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या मोहिमेचे उद्घाटन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे व रावेर वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, पोलीस निरीक्षक कैलास नागरे व रावेर वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, प्रसन्ना पोतदार या म्हणाल्या की, हा उपक्रम हा स्तुत्य असून, बाळासोबतच वृक्षाचेही संगोपन करण्याची संधीच जणू आम्हाला मिळाली असून, आम्ही डॉ.संदीप पाटील यांचे आभारी आहोत. कार्यक्रमात अंकिता प्रणय चौधरी, (पिंप्रीनांदू), लक्ष्मी अमोल चौधरी, (ऐनपूर), नाजमीनबी शेख जहीर (रसलपूर), नयना मंगलेश पाटील (नरवेल), नयना गणेश नंबरदार (बोरसर म.प्र.), प्रसन्ना सुहास पोतदार (भुसावळ), रूपाली आशिष माळी (रावेर), फरजाना बी शेख नासीर (भोर), संगीता संदीप भालेराव(ऐनपूर), पार्थ गोकुळ शिंदे (रावेर) यांना वेगवेगळ्या प्रकारची रोपे वृक्षभेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गझाला तबस्सूम यांनी केले. कार्यक्रमास ललित पाटील, राजेश भंगाळे, विजय पाटील, डॉ.एस.आर.पाटील, राजेश शिंदे, ईश्वर महाजन, राहुल पाटील, गौरव पाटील, योगेश कुलकर्णी, भूषण पाटील, नदीम शेख, जुबेर शेख आदी उपस्थित होते. आभार दीपक नगरे यांनी मानले.
रावेर येथे ‘एक बाळ, एक झाड’ या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन कैलास कडलग यांच्या हस्ते करताना. सोबत डॉ.संदीप पाटील, कैलास नागरे, मुकेश महाजन, डॉ.एस.आर. पाटील.