जळगाव : केसीई इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्चच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम या विषयावर आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आहे़ यामध्ये राज्यातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.प्रश्नमंजुषा स्पर्धा आयएमआरच्या संचालिका प्रा़ डॉ़ शिल्पा बेंडाळे यांच्या संकल्पनेतून ही राज्यस्तरीय आॅनलाईन प्रश्नमंजुषा २० मे रोजी घेण्यात आली. यावेळी राज्यामधील विविध जिल्ह्यामधील एकूण १ हजार ५०० विद्यार्थ्यांनी या संगणक प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेतला होता़ त्यात पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर, सातारा, पनवेल, मलकापूर, अक्रुडी, शेगाव, मलकापूर, संगमनेर, पिंपरी, अंबरनाथ, औरंगाबाद, नवी मुंबई आदी भागांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होता़ सोबतच बिहार मधील पाटणा, दरभंगा व मध्यप्रदेश मधील बºहाणपूर येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला़ स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना ईमेल द्वारेच त्वरित ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमासाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. तनुजा फेगडे, प्रा. प्रमोद घोगरे, राकेश राणे, प्रा. धनपाल वाघुुळदे, साधना थत्ते आदींची परिश्रम घेतले.
राज्यातील दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:53 IST