शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ही महागाई! चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक! १८५ रुपये किलोवर गेला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:20 IST

१८५ प्रतिकिलोने विक्री : चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनाडाळही महागली

जळगाव : ४० वर्षानंतर तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आवक नाही आणि ग्राहकही नाही, अशा परिस्थिती बाजाराची श्वासकोंडी झाली आहे. १८५ ते १९० प्रतिकिलोने तूरदाळ जळगावच्या बाजारात विक्री होत असून त्यासोबतच चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनादाळही महागाईच्या चुलीवर जाऊन बसली आहे. 

गेल्या हंगामात तुरीची लागवड घटली. खान्देशात सर्वाधिक कापसाची लागवड झाली. तर मराठवाडा, विदर्भातही कापूस, सोयाबीनला अनेकांनी पसंती दिली.त्यामुळे तुरीची लागवड घटली. त्यामुळे यंदा तूरदाळ दोनशे रुपयांवर पोहोचते की काय, याचीच भिती व्यक्त होऊ लागली आहे.४० वर्षानंतर तूरदाळीने दरवाढीचा उच्चांक गाठल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत तूरदाळीने भाव घेतला होता. त्यातुलनेत सध्याचे दर उच्चांक गाठणारा असल्याचे सांगण्यात आले.

जळगावची निर्यात घटलीसध्या तूरदाळीची आवक घटली आहे. नवे उत्पादन जानेवारीपर्यंत येईल. तोपर्यंत जळगावच्या ७५ दाल मिलच्या माध्यमातून अन्य दाळींवर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जळगावहून देशभरात दाळी निर्यात होतात. सध्या तूरदाळ महागल्याने तिच्यावर होणारी दैनंदिन प्रक्रिया कमी प्रमाणात केली जात आहे. दरम्यान,  दाळींसह वाटाणे, चने महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे आवक कमी असताना दुसरीकडे ग्राहकही नसल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी कोंडी झाली आहे.

दरवाढीचा तुलनात्मक आढावा (प्रतिकिलो)डाळ-पूर्वीचे दर-सध्याचे दरतूरडाळ-१६०-१८५मूगडाळ-१००-१०७चनाडाळ-६०-७५चने-१६२-१७०वाटाणा-७५-८०कोट५० वर्षांपासून या व्यवसायात आहे. तूरदाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. या भाववाढीवर सरकारचे नियंत्रण असायला हवे.स्वस्त दरात तुरीची डाळ आयात करून भाव नियंत्रण करायला हवेत. तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.-विजयकुमार रामदास वाणी, विक्रेते.पाऊस नाही. लागवड कमी आहे.पंधरवाड्यात दमदार पाऊस झाल्यास उत्पादनात वाढ होईल. सध्या तूरदाळीची मागणी कमी असल्याने अन्य उत्पादनावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.-प्रेम कोगटा, अध्यक्ष, दाल-मिल असोसिएशन.

टॅग्स :Inflationमहागाई