शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

सोने पॉलिशच्या बहाण्याने वृध्द महिलेला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 21:42 IST

विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली.

ठळक मुद्देचाळीसगावातील विवेकानंद कॉलनीतील घटनाभामट्यांनी लांबविला सव्वा दोन लाखांचा ऐवजचाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव - येथील विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली.शहरातील विवेकानंद कॉलनीतील रहिवाशी सुमनबाई जगन्नाथ भोकरे यांना अज्ञात दोन व्यक्तींनी पितळाच्या भांड्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यानंतर घरातील चांदीच्या पादुकांनादेखील पॉलिश करून दिली. त्यानंतर त्या दोघांनी सुमनबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे बघून तुमच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देऊ असे सांगितले. पितळी भांडे व चांदीच्या वस्तूंना पॉलीश केल्यानंतर सुमनबाई यांनी हातातील ६० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या व ६० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या त्यांच्याकडे काढून दिल्या. भामट्यांनी सुमनबाई यांना दागिन्यांना चकाकी येण्यासाठी गरम पाणी लागेल असे सांगून घरातून गरम पाणी मागितले. त्या घरात गेल्यानंतर दोघे ही चोरटे तेथून पसार झाले. सुमनबाई घरा बाहेर पाणी घेवून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरडाओरड केली असता आजू-बाजूचे नागरिक जमा झाले.त्यांनी त्या चोरट्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. सुमनबाई भोकरे यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत आपबिती कथन केली. त्यानंतर सुमनबाई भोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात दोघांविरूद्ध भा.दं.वि.४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ.बापुराव भोसले करीत आहे.

टॅग्स :GoldसोनंChalisgaonचाळीसगाव